शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 5:28 PM

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे.

नागपूर : सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर आमच्या अस्तित्वावर घाला घालणार असाल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघराहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. तर, सावरकरांचा सतत अपमान करणांऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार कसे काय फिरु शकतात? अशी खोचक टीका ठाकरेंवर केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. नागपुरातही भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत राहुल गांधींचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. 

एका बाजूला सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे करत आहेत. ज्यांच्या विचाराने जाज्वल्य इतिहास उजळला त्यांची महाराष्ट्रात अवहेलना केली जाते, हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न महाष्ट्रातला प्रत्येकजण विचारतोय, असे वाघ म्हणाल्या. पुढे बोलताना, कुणीतरी काहीतरी लिहून द्यायचं आणि आपण ते म्हणायचं ही कसली राजकीय प्रगल्भता? ही तर राजकीय दिवाळखोरी आहे, अशी खोचक त्यांनी टीका राहुल गांधींवर केली.

तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? 

संजय राठोडबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण आरोप करण्याचा नाही, असे त्या म्हणाल्या. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी माझी लढाई सोडलेली नाही. संजय राठोडविरुद्धचा लढा सुरुच राहणार. संजय राठोड यांच्याशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. पण जे झालं ते चुकीच होतं आणि त्यासाठीच मी लढत होते, असही त्यांनी सांगितलं. यवतमाळमध्ये झालेल्या पत्रपरिषदेवरुन प्रश्न विचारला असता, तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. तुम्हाला जर इतक वाटत असेत तर तुम्हीही माझ्या लढ्यात सहभागी व्हा असे म्हणत चुकली असेल तर एक हजारदा चित्रा वाघ माफी मागेल पण एक महिला म्हणून घेरत असाल तर मी पण चित्रा वाघ आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा

राज्यात गत तीन महिन्यांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारने पुढाकार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर व कमी व्हावे यावर आमचे कार्य सुरू असून, महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गत तीन महिन्यांत जिथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामधील संबंधितांवर लगेच कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच्या सरकारने विविध घटनांवर डोळेझाकपणा करून महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे