लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे ‘एफडीआय’संदर्भातील केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या स्वदेशी जागरण मंचतर्फे ‘मुद्रा बँक’संदर्भात प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाचे ‘मुद्रा’वर मंथनाने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या निवासस्थानी करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी डॉ. हेडगेवार यांचा तारखेनुसार जन्मदिवस असतो. या दिवशीच नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असून, यानिमित्ताने स्वदेशी जागरण मंचने ‘मुद्रा बँक’संदर्भात पुढाकार घेतला आहे. वित्त क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवक व व्यावसायिकांचे उद्बोधन व्हावे, यासाठी भारतीय अर्थशास्त्राचे अभ्यासक व तज्ज्ञ समीक्षक शेखर स्वामी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुद्रा बँकिंग : वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील मार्ग’ या मुद्यावर ते व्याख्यान देणार आहेत. १ एप्रिल रोजी सकाळी ७.४५ वाजता महाल येथील हेडगेवार निवासस्थानी हे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रमाणात वित्त क्षेत्रातील लोक यावेत, असा मंचचा प्रयत्न आहे. बॅकिंग, वित्त सल्लागार, चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, उद्योजक, व्यावसायिक, व्यवस्थापन अभ्यासक इत्यादी क्षेत्रातील लोकांना येथे आमंत्रित करण्यात आले आहे.
हेडगेवारांच्या निवासस्थानी ‘मुद्रा’वर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:04 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे ‘एफडीआय’संदर्भातील केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या स्वदेशी जागरण मंचतर्फे ‘मुद्रा बँक’संदर्भात प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाचे ‘मुद्रा’वर मंथनाने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या निवासस्थानी ...
ठळक मुद्देस्वदेशी जागरण मंचतर्फे नवीन आर्थिक वर्षाचे स्वागतशहरातील वित्त क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार