शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

प्रतापनगरात सिनेस्टाईल हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:07 AM

दारूच्या नशेत रोज रोज भांडण करणाºया व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर ती सुटकेस फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई आॅटोतून रेल्वेस्थानकाकडे निघाले.

ठळक मुद्देवडिलांचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला े रेल्वेतून फेकण्याचा कट े मृताची पत्नी ताब्यात, मुलगी, जावई फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत रोज रोज भांडण करणाºया व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर ती सुटकेस फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई आॅटोतून रेल्वेस्थानकाकडे निघाले. मात्र, आॅटोचालकाला संशय आल्यामुळे आरोपी दाम्पत्य पळून गेले आणि त्यानंतर एका थरारक हत्याकांडाचा खुलासा झाला. एखाद्या हिंसक चित्रपटातील वाटावे, तसे हे हत्याकांड प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी उघडकीस आले. मानसिंग कुंवरसिंग शिव (वय ५५)असे मृताचे नाव आहे.प्रतापनगर पोलीस चौकीजवळच्या झोपडपट्टीत राहतो. त्याला पत्नी ऊर्मिला आणि मुलगी किरण (वय २२) आहे. मुलीने बुलडाणा येथील विजय अशोक तिवारी नामक गुन्हेगाराशी प्रेमविवाह केलेला आहे. तिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. रविवारी रात्री किरण आणि तिचा पती प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिराजवळ आले. येथे उभे असलेले आॅटोचालक विनोद श्रावण सोनडवले (वय ४५, रा. विजयनगर) यांच्याशी त्यांनी बोलणी केली. आम्हाला सोमवारी पहाटे गावाला जायचे आहे. तुम्ही याल का, असे विचारले. सोनडवलेंनी होकार देऊन २५० रुपयांत भाडे पक्के केले. त्यावेळी सोनडवलेंनी आपला मोबाईल क्रमांक तिवारी दाम्पत्याला दिला.सोमवारी पहाटे २.४० वाजता प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिराजवळ सोनडवले आॅटो घेऊन उभे होते. त्यांना तिवारीचा फोन आला. तुम्ही आॅटो घेऊन प्रतापनगर पोलीस चौकीजवळ या, असे तो म्हणाला. दुर्गा माता मंदिराजवळून भाडे ठरले, त्यामुळे सोनडवलेने तेथे जाण्यास नकार दिला आणि मंदिराजवळ येण्याची सूचना केली. काही वेळेनंतर भली मोठी सुटकेस घेऊन आलेल्या तिवारी दाम्पत्याने ती सुटकेस आॅटो सीटच्या मागे असलेल्या जागेत कोंबण्याचे प्रयत्न केले. सुटकेस मोठी असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे मध्ये सुटकेस ठेवून तिवारी दाम्पत्य आॅटोत बसले. या दोघांना घेऊन सोनडवले रेल्वेस्थानकाकडे निघाले.सुटकेसमधून तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळे आणि आरोपी दाम्पत्य वारंवार बॉडी स्प्रे मारत असल्याने सोनडवलेंना संशय आला. त्यामुळे त्यांनी लघुशंकेचा बहाणा करून माटे चौकाजवळ आॅटो थांबवला. ते बाजूला जाऊन फोनवर बोलत असल्याचे पाहून आॅटोतील तिवारी दाम्पत्याला संशय आला.त्यामुळे त्यांनी आॅटोतून पळ काढला. आॅटोचालक सोनडवलेने नियंत्रण कक्षात फोन केला. त्यामुळे काही वेळातच प्रतापनगर पोलिसांचे गस्ती पथक तेथे पोहचले.पोलिसांनी सुटकेस उघडून बघितली असता त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. सुटकेसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दोघे घेऊन जात असल्याचे वृत्त वाºयासारखे नागपुरात पसरले अन् प्रतापनगर ठाण्यासमोर अल्पापवधीतच मोठी गर्दी जमली. सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. काही वेळातच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, ठाणेदार शिवाजीराव गायकवाड ठाण्यात पोहचले.सीसीटीव्हीतून पटली आरोपींची ओळखज्या सुटकेसमध्ये मानसिंगचा मृतदेह होता, ती सुटकेस नॉव्हेल्टी कंपनीची होती. त्यामुळे प्रतापनगर पोलिसांनी सीताबर्डीतील नॉव्हेल्टी बॅग सेंटर गाठले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता लाल गुलाबी रंगाची सलवार कुर्ती घातलेली तरुणी आणि निळा शर्ट घातलेला एक तरुण ही बॅग विकत घेत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. आॅटोचालक सोनडवलेने ते फुटेज बघून सकाळी आॅटोतून पळालेले हेच ते दोघे असल्याचे सांगितले. आरोपी तिवारीने आॅटो प्रतापनगर पोलीस चौकीजवळ आण, असे म्हटले होते. ते सांगताच पोलिसांनी त्या भागात चौकशी केल्यानंतर मृत व्यक्ती मानसिंग कुंवरसिंग शिव असल्याचे स्पष्ट झाले. मानसिंगचा खून कुणी केला त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याची पत्नी ऊर्मिलाला ताब्यात घेतले. त्यानंतर घरगुती वादातून मानसिंगची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर तो रेल्वेतून फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई रेल्वेस्थानकाकडे निघाल्याचेही तिने सांगितले. तिची मानसिक स्थिती चांगली नाही. तिचा या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही तेदेखील स्पष्ट नाही. आरोपी तिवारी दाम्पत्याचा दोन वर्षांचा मुलगा ऊर्मिलाजवळ असल्याने तूर्त पोलिसांनी तिला अटक करण्याचे टाळले.आॅटोचालकाचा सत्कारआॅटोचालक सोनडवलेच्या सतर्कतेमुळे या थरारक हत्याकांडाचा खुलासा झाला. काही वेळेपूर्वी सोनडवलेला एक पोलीस व्हॅन आरपीटीएसकडे जाताना दिसली. त्याचमुळे त्याने मध्ये आॅटो थांबवून पोलीस व्हॅनकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृतीमुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला. त्याची दखल घेत सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आॅटोचालक सोनडवलेचा पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, ठाणेदार शिवाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यालयात सत्कार केला.भंडारा, गोंदियाकडे पळाले आरोपीआरोपींनी मानसिंगला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यावर फटका बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. डॉक्टरांनी अद्याप शवविच्छेदन अहवाल पोलिसांना दिला नाही, त्यामुळे हा केवळ अंदाज आहे. मात्र, त्याची हत्या दोन दिवसांपूर्वीच आरोपींनी केली असावी, असा संशय आहे. दरम्यान, आरोपी किरण आणि विजय हे नवराबायको भंडारा, गोंदियाकडे पळून गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेशाखा आणि प्रतापनगर पोलिसांची पथके बुलडाण्यासह भंडारा-गोदिंयाकडे आरोपींचा शोध घेत आहेत.