शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

नागपुरातील कोराडी व खापरखेडाजवळच्या २१ गावातील नागरिक पीत आहेत विषारी पाणी; हानीकारक घटकांचे प्रमाण १५ पट अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 8:06 PM

Nagpur News काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

ठळक मुद्देवीज केंद्राजवळ सर्वेक्षणातील भयावह वास्तव 

 

नागपूर : काेराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पामुळे हाेणाऱ्या वायूप्रदूषणाची कल्पना बहुतेकांना आहे. मात्र, वीज केंद्रातील राखेमुळे जलप्रदूषणाची स्थिती त्याहून भयावह झालेली आहे. दाेन्ही प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व गावांमधील नागरिक पाण्याच्या रूपात विष पित आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी), नागपूर, मंथन अध्ययन केंद्र, पुणे आणि असर साेशल इम्पॅक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिकांच्या सहभागातून केलेल्या अभ्यासात हे वास्तव समाेर आले आहे. सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे, मंथनचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी यांनी या अभ्यासातील माहिती लाेकमतला दिली. फ्लायॲशच्या नमुन्यांमध्ये पीएम-२.५ व पीएम-१० च्या कणांसह आर्सेनिक, कॅडमियम, क्राेमियम, लेड, मॅंगनीज, मर्क्युरी, काेबाल्ट आदी जड धातूंचे घटक माेठ्या प्रमाणात असतात. हेच विषारी घटक आसपासच्या परिसरातील भूपृष्ठावरील पाणी, भूजलाच्या नमुन्यातही आढळले. टीमने २५ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात माेठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षार व विरघळलेले घनतत्व आढळून आले.

यापेक्षा गंभीर म्हणजे या सर्व नमुन्यात सर्वात धाेकादायक मानले जाणारे मर्क्युरी, आर्सेनिक, लिथियम, अल्युमिनियम, सेलेनियम, आयर्न, काॅपर, निकेल, झिंक, फ्लाेराईड, ॲन्टिमाॅनी, बाेराेन, माॅलिबडेनम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पाण्याच्या निकषाच्या १५ पट अधिक आढळून आले. यातील काही ठिकाणच्या नमुन्यात मर्क्युरी, आर्सेनिक व अल्युमिनियमचे प्रमाण माेठ्या प्रमाणात आहे. कन्हान नदी काठावरील ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात अल्युमिनियम १०० पट अधिक हाेते. खैरी गावाजवळच्या नमुन्यात मर्क्युरी व फ्लाेराईडचे प्रमाण ५०पट अधिक आढळले. हे पाणी पिण्यासाठी, आंघाेळ, कपडे धुण्यासह इतर घरघुती उपयाेग, मासेमारी, सिंचन व गुरांसाठीही वापरले जाते. या गावातील नागरिक अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले असून, त्यांना गंभीर धाेक्यात जगावे लागत आहे.

१८ गावे राखेने बाधित

सर्वेक्षण केलेल्या २१ गावांपैकी १८ गावे दाेन्ही वीज केंद्रातून उत्सर्जन व धुरांड्याद्वारे निघणाऱ्या काेळशाच्या राखेने बाधित झाली आहेत. लाेकांच्या घराच्या छतावर, पाण्याचे साठे, माेकळ्या जागा व वाहनांवर दरराेज राख साचून राहते. ही राख पिकांवर साचून राहते. त्यामुळे पिकांची वाढ थांबते, उत्पन्नात घट हाेते तसेच जनावरे व दुग्ध उत्पादनांवर परिणाम हाेत आहे.

वाॅटर एटीएमचे पाणीही बाधित

शुद्ध पाणी मिळावे म्हणून प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये वाॅटर एटीएम लावण्यात आले. या एटीएमच्या पाण्यातही कमी प्रमाणात असले तरी विषारी घटक आढळल्याचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितले.

नागपूरला येणारे पाणीही प्रदूषित

कन्हान नदीवरूनच नागपूर शहराला पाणीपुरवठा हाेताे. मागील वेळी नदी पात्रात राख साचल्याने पाणीपुरवठा बाधित झाला हाेता. शहरातील पाण्याचे नमुने तपासले नसले तरी राखेतील विषारी घटकांचे प्रदूषण शहरात येणाऱ्या पाण्यातही असण्याची शक्यता धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य