शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

विदर्भात नागरिकांनी पाळला जनता कर्फ्यु; सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:44 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील नागरिकांनी जनता कर्फ्युला पाळल्याचे दृश्य गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात दिसले.

ठळक मुद्देगडचिरोलीसह सर्व जिल्हे कडकडीत बंद

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील नागरिकांनी जनता कर्फ्युला पाळल्याचे दृश्य गडचिरोली, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यात दिसले.वर्धा रेल्वेस्थानकावर एरव्ही मोठी गर्दी असते. मात्र रविवारी सकाळी तिथे चिटपाखरूही नव्हते. वंजारी चौक, आरती चौक, बसस्थानकावरही सर्वत्र शांतता होती.गोंदिया जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली आहेत.भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.गोंदियातील मुख्य बाजारपेठी,जयस्तंभ चौक,फुलचूर नाका,अवंतीबाई चौक, कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही ओसरली आहे. गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.एरवी सतत गजबजून राहणा?्या गडचिरोलीमधील इंदिरा गांधी चौकात आज असा शुकशुकाट आहे. एखाद्या दुचाकीचा अपवाद सोडता कोणीही रस्त्याने फिरताना दिसत नाही. गडचिरोली शहरच नाही तर संपूर्ण जिल्हाभरात नागरिकांनी अशा पद्धतीने संपूर्ण व्यवहार अभूतपूर्व बंद ठरवून 'जनता कर्फ्यु'च्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

यवतमाळ  जिल्ह्यात लाँक डाऊन. रस्ते निर्मनुष्य. जनता कर्फ्यूला प्रतिसाद आहे.  यवतमाळ; वणी; उमरखेड; आर्णी; महागाव; दारव्हासह सर्वच तालुक्यात शुकशुकाट आहे.भंडारा शहरातही मुख्य बाजारपेठेसह सर्व भागात शांतता होती. कुणीही बाहेर पडत नव्हते. राष्ट्रीय महामार्गावरची वर्दळ पूर्णपणे थांबलेली होती.चंद्रपुरातील एरव्ही नेहमीच गजबजलेल्या गांधी चौक, गिरनार चौक, जटपुरा गेट, ज्युबिली हायस्कूल चौक, बंगाली कॅम्प चौक, प्रियदर्शिनी चौक आणि वरोरा नाका चौकात शुकशुकाट होता.अमरावतीच्या राजकमल चौक, इर्विन चौक, राजापेठ, गाडगेनगर , पंचवटी कटोरा नाका आदी भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळल्याचे दिसत होते.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस