लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : सध्या माेबाइल कंपन्या कव्हरेज वाढविण्यासाठी ठिकठिकाणी नवीन बूस्टर व माेबाइल टाॅवर लावत आहेत. या टाॅवरमुळे नागरिकांच्या आराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम पाहता माेबाइल टाॅवरला नागरिकांनी विराेध दर्शविला आहे. शहरात लाेकवस्ती भागातील इमारतीवर टाॅवर अथवा बूस्टर लावू नये या मागणीसाठी नागरिकांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे.
पारशिवनी शहरातील रामटेक मार्गावरील एका दुमजली इमारतीवर साेमवारी (दि.३) खासगी माेबाइल कंपनीचे बूस्टर लावण्यासाठी हालचाली सुरू हाेत्या. ही बाब शेजाऱ्यांना ध्यानात येताच नागरिक एकत्रित झाले. काम करणाऱ्या मजुरांना टाॅवरबाबत विचारणा केली असता, ते माेबाइल कंपनीचे बूस्टर असल्याचे समजले. लगेच नगरसेवक विजय भुते यांनी नगरपंचायतीत फाेनद्वारे टाॅवर बूस्टरच्या परवानगीबाबत विचारणा केली. याबाबत नगरपंचायतीने काेणतीही परवानगी दिली नसल्याचे कळले. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी टाॅवरचे काम बंद करण्यास सांगितले. नागरिकांचा राेष पाहता मजूर काम साेडून गेले.
माेबाइल टाॅवर व बूस्टरमुळे मानवाच्या शारीरिक व मानसिक आराेग्य विपरीत परिणाम हाेत असून, लाेकवस्ती भागाच्या किमान ४०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर असावे. त्यामुळे लाेकवस्ती भागात हे टाॅवर लावू नये, अशी मागणी नागरिकांनी नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भगवान बेदरे, सुधीर कापसे , सचिन जामगडे, रेवाराम शिवणकर, सीमा भड, सपना कोचर, विजय देऊळकर, विनोद मस्के, रामा चोपकर, ज्ञानेश्वर कामडे, अनिता बोरकर, रमेश राऊत, चिंतामण पाटील, ज्ञानेश्वर साबळे, रमेश लोणारे, तेजस चोपकर आदींसह नागरिक उपस्थित हाेते.