लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमण वाढतीवर असतानाच कळमेश्वर येथे टेस्टिंग किटचा तुटवडा निर्माण झाला हाेता. तालुक्यात केवळ ३०० आरटीपीसीआर चाचणी केली जात हाेती. त्यामुळे अनेकांना चाचणीविनाच परत जावे लागत हाेते. याबाबत लाेकमतने १ मे राेजीच्या अंकात ‘कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किटचा तुटवडा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आराेग्य विभागाने कळमेश्वर येथे टेस्टिंग किट उपलब्ध केल्या आहेत. लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी काेविड चाचणी करावी, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले आहे.
कळमेश्वर येथे दरराेज काेविड चाचणी हाेणार असून, ग्रामीण रुग्णालयामार्फत शहरात आरटीपीसीआर २००, प्राथमिक आराेग्य केंद्रामार्फत ३०० चाचण्या केल्या जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात चाचणीसाठी अधिक नागरिक आल्यास २०० पेक्षा अधिक चाचणी केल्या जातील. आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य असून, रिपाेर्ट आता दुसऱ्या दिवशी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी. अंगावर ताप, दुखणे, सर्दी-खोकला काढू नये, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच ॲन्टिजेन किटसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून अतिआवश्यक रुग्णांची तपासणी त्याद्वारे होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.