लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी कोरोना हा आजारच घातक असल्याने प्रत्येक नागरिकाने कोरोना त्रिसूत्रीचे (मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे) इत्यादीचे कसोशीने पालन करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
दुसरी लाट ओसरली असली तरी नागरिकांनी निर्बंधांचे पालन करावे. प्रशासन लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवत आहे. लसीकरणासोबत सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संशयितांच्या तपासण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, ज्याही नागरिकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांनी तातडीने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व कोविडपासून आपला बचाव करावा, असे आवाहन पालकमंत्री राऊत यांनी यावेळी केले.