शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
7
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
8
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
9
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
10
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
11
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
12
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
13
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
14
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
15
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
16
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
17
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
18
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
19
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
20
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

नागरिकांनी रोखले त्रिमूर्तीनगरातील सिमेंट रोडचे काम, भाजयुमो पदाधिकारीदेखील उतरले रस्त्यावर

By योगेश पांडे | Published: August 06, 2024 5:35 PM

Nagpur : कंत्राटदारांकडून करण्यात येणाऱ्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत जागोजागी सिमेंट मार्गांचे काम सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी सिमेंट मार्गांच्या कामातील संथपणा व कंत्राटदारांकडून करण्यात येणारी हलगर्जी यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मंगळवारी त्रिमूर्तीनगर परिसरात नागरिक या थंड कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले व काम बंद पाडले. आश्चर्याची बाब म्हणजे या नागरिकांमध्ये भाजपा व भाजयुमोचे कार्यकर्ते व पदाधिकारीदेखील होते. एकीकडे नेत्यांकडून सिमेंट मार्ग बांधण्याचा सपाटा लावण्यात येत असताना कार्यकर्त्यांकडूनच विरोध झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. विशेषत: दक्षिण-पश्चिम नागपुरात रिंग रोड ते ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या चार ते पाच मोठ्या मार्गांवर सिमेंट रस्त्यांचा काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने होत आहे. अर्धा रस्ता तयार झाल्यावर एक बाजू उंच झाली आहे. मात्र कंत्राटदाराने तेथे बॅरिकेट्स लावलेलेच नाही. त्यामुळे त्रिमूर्तीनगर चौकाकडून ऑरेंज स्ट्रीटकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. वाहने सिमेंट रस्त्याच्या खाली उतरून लोक पडत आहे. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. याविरोधात तक्रारी करूनदेखील नासुप्रचे अधिकारी व कंत्राटदार यांनी काहीच पावले उचलली नव्हती. अखेर नागरिकच रस्त्यावर उतरले व काम बंद पाडले. नासुप्रचे अधिकारी व कंत्राटदार पोहोचल्यावर त्यांनी बॅरिकेडिंग करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलन करणाऱ्यांमध्ये भाजयुमोचे प्रदेश सचिव देवा डेहनकर व इतर भाजप कार्यकर्तेदेखील होते. सिमेंट मार्गांतील कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे त्यांच्यातदेखील नाराजी असल्याची बाब समोर आली आहे.

एप्रिल महिन्यापासून पेव्हर ब्लॉकच नाहीभेंडे ले आऊट चौक ते रिंग रोड या मार्गावर सहा महिन्यांअगोदर सिमेंट मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. एप्रिल महिन्यात सिमेंट मार्ग तयारदेखील झाला. मात्र त्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला व इतर आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक्सच लावलेले नाहीत. शिवाय रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यादेखील अर्धवटच टाकून दिल्या असून त्यातील सळाखींमुळे थेट जीव जाण्याचाच धोका आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील अधिकारी व कंत्राटदाराने काम सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सिमेंट मार्ग बनवलाच का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा