काटाेल : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात घरफाेड्या व शेतकऱ्यांची जनावरे चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चाेरीच्या या घटनांना वेळीच आळा घातला जात नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे.
काही दिवसांपूर्वी चाेरट्यांनी काटाेल शहरातील शनि चाैक, आययुडीपी, पंचवटी, धंताेली या भागात घरफाेडी करीत साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह राेख रक्कम चाेरून नेल्याच्या घटना घडल्या हाेत्या. ग्रामीण भागातही चाेरट्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांची जनावरे तसेच शेतीपयाेगी साहित्य शेतातील झाडे चाेरीला जात आहेत. काेराेना संक्रमणापासून चाेरट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. काहींनी त्यांच्याकडील चाेरीच्या घटनांबाबत पाेलिसात तक्रारी नाेंदविल्या. पाेलिसांनी चाेरट्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ठाेस माहिती मिळत नसल्याने चाेरट्यांना अटक करण्यात तसेच त्यांचा कायम बंदाेबस्त करण्यात पाेलिसांना अद्यापही यश आलेले नाही.
शेतकरी आधीच संकटात आहेत. त्यातच त्यांची जनावरे आणि शेतीपयाेगी साहित्य चाेरीला जात असल्याने त्यांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बैलजाेडी किंवा जाेडीतील एक बैल चाेरीला गेल्यास शेतीची कामे रखडली जात असल्याने त्यामुळे हाेणारे नुकसान वेगळे आहे, असेही काहींनी सांगितले. चाेरीच्या या घटनांना आळा घालण्यासाठी पाेलिसांनी ग्रामीण भागातील गस्त वाढवावी, तसेच चाेरट्यांना अटक करून त्यांचा कायम बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.