शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

वाहक न मिळाल्याने नागपूर शहर बसला २.६१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:14 AM

चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ४० हजार फेऱ्या बाधित : प्रावाशांचीही झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालक आहेत मात्र ऐनवेळी वाहक (कंडक्टर) न मिळाल्याने महापालिकेच्या शहर बसच्या सुमारे ४० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे गेल्या वर्षभरात महापालिके च्या परिवहन विभागाला २ कोटी ६१ लाखांचा फटका बसला आहे. त्यातच कधी बस कर्मचाऱ्यांचा संप तर कधी आयबीटीएस आॅपरेटर डिम्ट्सची मनमानी यामुळे वाहकचा अभाव बससेवा सुरळीत चालविण्यात बाधा ठरत आहे.शहरात सध्या ३७५ बसेस धावत असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात उभ्या असलेल्या बसेस चालविण्यासाठी वाहक उपलब्ध न केल्याने रविवारी बसेसच्या ५० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सोमवारीसुद्धा २५ ते ३० फेऱ्या होऊ शकल्या नाही.बसेस न धावल्याने तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होतो. शहरात तीन रेड बस आॅपरेटर व एक ग्रीन बस आॅपरेटर आहे. सध्या २५ ग्रीन बसेस धावत आहेत. शहर बससेवेतील रेड बसेसमधून दररोज १.७५ ते १.८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. प्रति किलोमीटरच्या आधारावर बस आॅपरेटरला महापालिके ला आर्थिक मोबदला द्यावा लागतो. मात्र तिकिटाची रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली जाते. बस वाहकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी डिम्ट्स कंपनीवर आहे. एसआयएस व युनिटी कंपनीमार्फ त वाहकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहर बससेवेत १८०० वाहक आहेत. त्यांची डिम्टस्च्या माध्यमातून विविध मार्गावर नियुक्ती के ली जाते. वाहकांनी तिकिटांच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम महापालिके च्या खात्यात जमा केली जाते. विना वाहक बसेस धावल्या तर ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा होत नाही.परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनीही वाहक उपलब्ध होत नसल्याला दुजोरा दिला. यासंदर्भात डिम्ट्सला नोटीस बजावून खुलासा मागविला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले.कधी संप तर कधी मनमानीकधी संप तर कधी डिम्ट्स कंपनीमुळे शहर बसला वाहक उपलब्ध झाले नाही. यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी खाली उतरतात. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आर.के.सिटी बस सर्व्हिसेसला वाहक न मिळाल्याने १६५३२७ कि.मी.चे संचालन प्रभावित झाले. यामुळे ८२.६६ लाखांचे नुकसान झाले. हंसा सिटी बस सर्व्हिसेस यांना वाहक न मिळाल्याने १८६२०६ कि. मी.चे संचालन करता आले नाही. यामुळे ८८.३३ लाखांचे तर ट्रॅव्हल टाईमला ९०.५६ लाखांचे नुकसान झाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक