लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूह आणि धनश्री महिला नागरि पतसंस्थेच्यावतीने देवनगरच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात ग्रामायण २०१८ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामायण २०१८ प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने मोठमोठ्या कंपन्यांना ‘सीएसआर’ (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंड विविध संस्थांना देण्याचे बंधन घालून दिलेले आहे. त्यामुळे विदर्भातील गरजू संस्थांना मदत व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूहातर्फे विविध कार्पोरेट कंपन्यांना प्रदर्शनात पाचारण करण्यात आले आहे. प्रदर्शनात ग्रामीण भागातील संस्थांचे एकुण ९६ स्टॉल्स असून यात नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आदी जिल्ह्यातील संस्थांचा समावेश आहे.सक्षमच्या दिव्यांग मुलांच्या कलाकृतीअकोला येथील सक्षम (क्षितिज) या संस्थेतील दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींचा स्टॉल प्रदर्शनात आहे. संस्था दृष्टिहीन मुलांसाठी १२ वर्षांपासून कार्य करते. संस्थेत २५ मुलामुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करवून घेण्यात येते. स्वयंरोजगाराकडे वळु इच्छिणाऱ्या
विदर्भातील सामाजिक संस्थांसाठी हक्काचे व्यासपीठ : ग्रामायण २०१८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:12 PM
विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ग्रामायण समूह आणि धनश्री महिला नागरि पतसंस्थेच्यावतीने देवनगरच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात ग्रामायण २०१८ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्रदर्शनाचा अखेरचा दिवस