शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:41 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्वस्त धान्य दुकानाविषयीच्या प्रकरणामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला. तसेच, मंत्र्यांनी दुकानाविरुद्ध दिलेला आदेश रद्द केला.

ठळक मुद्देहायकोर्ट : स्वस्त धान्य दुकानाविरुद्धचा आदेश रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्वस्त धान्य दुकानाविषयीच्या प्रकरणामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला. तसेच, मंत्र्यांनी दुकानाविरुद्ध दिलेला आदेश रद्द केला.गोंदिया जिल्ह्यात गणेश नेवारे यांचे १९८५ पासून स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाविरुद्ध शोभा बावनकर व इतरांनी वजनमाप कमी देणे, नियमापेक्षा जास्त भाव घेणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्यामुळे दुकानाचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. त्याविरुद्ध नेवारे यांनी विभागीय पुरवठा उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते. विभागीय पुरवठा उपायुक्तांनी अपील मंजूर करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आदेश रद्द केला होता. परिणामी, तक्रारकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून विभागीय पुरवठा उपायुक्तांचा आदेश रद्द केला व जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा आदेश कायम ठेवला. तत्पूर्वी दुकानाचे लायसन्स नेवारे यांच्या पत्नी कौशल्या यांच्या नावावर करण्यात आले होते. त्यामुळे कौशल्या नेवारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी विविध बाबी लक्षात घेता त्यांची याचिका मंजूर केली आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा वादग्रस्त आदेश रद्द करून त्यांच्यावर दहा हजार रुपये दावा खर्च बसवला. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.वाईट हेतूने दिला आदेशउच्च न्यायालयाने या निर्णयात अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी वाईट हेतूने आदेश दिला. त्यांचा आदेश कायद्याच्या कसोटीत बसत नाही. तो आदेश कायम ठेवला जाऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयministerमंत्री