शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 9:35 PM

केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले.

ठळक मुद्दे५५ क्रमांकावरून पोहचले ५८ वर : सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस व सर्टिफिकेशनमध्ये पडले कमी गुण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्रशासन अपेक्षित उपाययोजना करू न शकल्याने नागपूर पुन्हा तीन अंकाने पिछाडीवर गेले.गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ४००० पैकी २८३४.९५ गुण मिळाले होते. ४७१ शहरांपैकी नागपूर ५५ क्रमांकावर आले होते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात ५००० गुण ठेवण्यात आले होते. यातून ३१६०.३१ गुण नागपूरला मिळाले. यात देशभरातून ४२५ शहरांनी भाग घेतला होता. नागपूर ५८ व्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे यावर्षी चंद्रपूरने २९, वर्धा जिल्हा ३४ व्या क्रमाकांवर राहिला.असे मिळाले गुणस्वच्छ सर्वेक्षणात डायरेक्ट ऑब्झर्व्हेशन, सिटीजन फिडबॅक, सर्व्हिस लेव्हल प्रोगे्रस व सर्टिफिकेशन यावर प्रत्येकी १२५० गुण होते. २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात डायरेक्ट ऑब्झर्व्हेशनवर नागपूरला ११३८, सिटीजन फिडबॅकवर ९३७.७ गुण मिळाले; पण सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसवर ५३७.६१ व सर्टिफिकेशनवर ५५० गुण मिळाले.येथे ठरले कमजोरसिटीजन फिडबॅकमध्ये मनपाने स्वच्छता अ‍ॅप लोकांकडून डाऊनलोड करून घेतला. त्याला चांगला प्रतिसाद नागपूरच्या जनतेने दिला. पण सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये कचरा संकलन आणि वाहतूक, कचऱ्याचे व्यवस्थापन, शाश्वत स्वच्छता, स्वच्छतेच्या बाबतीत माहिती, शिक्षण आणि संपर्क, स्वच्छतेच्या बाबतीत कायदे आणि नवीन संशोधन यात विशेष काम करू शकले नाही. त्यामुळे गुणांमध्ये मोठी घसरण झाली; शिवाय सर्टिफिकेशनच्या स्टार रँकिंगमध्ये नागपूरला २ स्टार मिळाले. यात हागणदारीमुक्त शहर यावरसुद्धा गुण होते. त्यातही नागपूर घसरले.स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरच्या घसरणीला घणकचरा व्यवस्थापन हे कारणीभूत ठरले आहे. शहरात कचरा संकलन होते. पण त्याची विल्हेवाट लावण्यात मनपा अपयशी ठरली आहे; शिवाय मनपाला स्वच्छतेच्या बाबतीत पहिले सहा महिने काहीच करता आले नाही. नवीन आयुक्त आल्यानंतर स्वच्छतेच्या कामात गती आली.कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनमहाराष्ट्रात नागपूर १८ व्या स्थानी१) मुंबई २) कोल्हापूर ३) मीरा भाईंदर ४) चंद्रपूर ५) अंबरनाथ ६) वर्धा ७) वसई विरार ८) पुणे ९) लातूर १०) सातारा ११) ग्रेटर मुंबई १२) बदलापूर १३) पिंपरी-चिंचवड १४) उदगीर १५) सोलापूर १६) धुळे १७) ठाणे १८) नागपूर.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर