लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. लक्ष्मी नगर झोनमधील सर्व जलकुंभ स्वच्छता ११ ते २६ फेब्रुवारी दरम्यान करण्याचे ठरविले आहे.
गायत्री नगर जलकुंभ ११ फेब्रुवारी, खामला (पांडे लेआऊट) जलकुंभ १३ फेब्रुवारी,लक्ष्मीनगर नवे जलकुंभ १५ फेब्रुवारी , लक्ष्मीनगर जुने जलकुंभ १७ फेब्रुवारी, टाकळी सीम जलकुंभ व टाकळी सीम संप (हिंगणा टी-पॉइंट) २० फेब्रुवारी, प्रतापनगर जलकुंभ २२ फेब्रुवारी , त्रिमूर्ती नगर नवे जलकुंभ व जयताळा संप २६ फेब्रुवारी रोजी स्वच्छ करण्यात येतील.
सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. जलकुंभ स्वच्छतेमुळे त्या-त्या भागाचा पाणीपुरवठा ब्ंद राहील. शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-ओसीडब्ल्यूने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.