नवी दिल्ली : कोलकात्यात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत कारकून म्हणून काम करीत असलेल्या स्नेहाशिष कार याची १.७ कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. स्नेहाशिष कार आणि त्याच्या कुटुंबियांची १.७ कोटी रुपयांची मालमत्ता हवाला व्यवहार प्रतिबंध कायद्याखाली (उत्पन्नाच्या ज्ञात मार्गांपेक्षा जास्त संपत्ती असणे) जप्त करण्यात आली आहे.
कार याने अनेक महिने त्याच्या बँक खात्यातील वेतनाची रक्कम काढली नव्हती. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. जप्त संपत्तीत बँक खाती, पोस्ट आॅफिस अकाऊंटस्, जीवन विम्याच्या पॉलिसीज, कार आणि कोलकात्यातील दोन अपार्टमेंटस्चा समावेश आहे.