लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षानेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ठोशाला ठोसा, दगडाला दगड व तलवारीला तलवारीने उत्तर देऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले.नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. वारीस पठाण यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्यांना त्याच पद्धतीचे उत्तर देण्यासाठी देशाचा युवक, देशभक्त , भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. आम्ही संयमी व सहिष्णू आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा प्रवृत्तीचा बीमोड करु शकत नाही. पठाण यांनी गुजरात आठवावा. तेथील मुसलमान असे बोलण्याची हिंमतदेखील करत नाही, असे गिरीश व्यास म्हणाले.मुस्लिमांनी बहिष्कार घालावावारीस पठाण, ओवैसी बंधू यांची अशाच प्रकारची जहरी टीका आम्ही सहन करत आहोत. अशा लोकांची जीभ छाटण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हे लोक समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावर मुस्लिम समाजानेच बहिष्कार घातला पाहिजे, असे मत गिरीश व्यास यांनी व्यक्त केले.हिंमत असेल तर नागपूरला यायावेळी गिरीश व्यास यांनी वारीस पठाण यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नागपूरला यावे, असे आव्हानच दिले. जर ताकद असेल तर त्यांनी येथे येऊन पहावे. त्यांची आम्ही योग्य व्यवस्था करु. भारत सरकारनेदेखील पठाणवर बंदी घालून पाकिस्तानमध्ये सोडायला हवे, असेदेखील व्यास म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी वारीस पठाणवर मुंबईबंदीच करावी : गिरीश व्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 9:13 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाची जाण ठेवत वारीस पठाणवर मुंबई बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केले.
ठळक मुद्देआम्ही तलवारीला तलवारीने उत्तर देऊ शकतो