लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील कोळसा खाणीमधून कोळसा घेऊन निघालेले ट्रक रस्त्यातच रिकामे होतात. त्याचे अवैध साठे केले जातात. मागील काही दिवसापासून ही कोळशाची हेराफेरी सुरू असली तरी पर्यावरण विभाग मात्र डोळे बंद करून बघत आहे. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल त्यांनी केलेल्या तक्रारीत अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीतून हा प्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींतून निघणारा कोळसा ट्रकच्या माध्यमातून वीज निर्मिती केंद्रात पाठविला जातो. मात्र मार्गातच कोळशाची हेराफेरी होते. रस्त्यातच ट्रकधील कोळसा उतरवला जातो. या कोळशाचा साठा भंडारा रोड, बुटीबोरी मार्गावर अवैधपणे केला जात आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या हातमिळवणीतून हा प्रकार सुरू असून चांगल्या प्रतीचा कोळसा गायब केला जातो, असा आरोप तुमाने यांनी केला आहे. हेराफेरीचा हा कोळसा शहरातील गोदामांमध्ये ठेवला जातो. त्यानंंतर व्यापाºयांना विकला जातो. कोळसा ट्रान्सपोर्टर कंपन्या आणि गोदाम संचालक या काळ्या व्यवहाराय बरीच कमाई करीत आहेत. मात्र दुसरीकडे कोळसा केंद्र चांगल्या प्रतीच्या कोळशापासून वंचित होत आहेत.हे लक्षात घेता अवैध कोळसा साठा करणाऱ्या गोदामांना बंद करण्यासाठी तात्काळ आदेश काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. कोळसा वाहतूक आणि त्याचा अवैध साठा करणाऱ्यांविरूद्ध कडक कायदा तयार केला जावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.
वीज केंद्राकडे निघालेले कोळशाचे ट्रक रस्त्यातच होतात रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 9:53 PM
मागील काही दिवसापासून ही कोळशाची हेराफेरी सुरू असली तरी पर्यावरण विभाग मात्र डोळे बंद करून बघत आहे. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
ठळक मुद्देकृपाल तुमानेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : कोळशाच्या हेराफेरीवर कारवाईची मागणी