नागपूर : लोकमतने डिसेंबर २०१९ मध्ये उघडकीस आणलेल्या कोळसा धुण्याच्या निविदेत झालेल्या घोटाळ्याची (कोल वॉशरी) चौकशी करण्याचा आदेश शुक्रवारी राज्य सरकारने काढला आहे. राज्य सरकारने उद्योग व खनिकर्म विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक चार सदस्यीय समिती नेमली. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व खनिकर्म विभागाचे उपसचिव हे याचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी महाजेनकोने राज्य खनिकर्म महामंडळास कोळसा पुरवठ्यासाठी एजंट म्हणून नियुक्त केले. सप्टेंबर २०१९मध्ये खनिकर्म महामंडळाने २२ दशलक्ष टन कोळसा धुण्याची निविदा काढली. त्यात गुरुग्रामची एसीबी लिमिटेड व कोलकात्याची हिंद एनर्जी व त्यांच्या चार उपकंपन्यांसाठी पात्रता निकष बदलून निविदा दिली. हा घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता.
कोल वॉशरी घोटाळ्याची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:13 AM