शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कोकेनची तस्करी पकडली

By admin | Published: March 17, 2016 3:18 AM

शहरात ६० लाख रुपये किमतीचे एक किलो ‘कोकेन’ जप्त करण्यात आले आहे.

तिघांना अटक :६०.४५ लाखांचा माल जप्त नागपूर : शहरात ६० लाख रुपये किमतीचे एक किलो ‘कोकेन’ जप्त करण्यात आले आहे. गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून नागपुरातील ही पहिलीच कारवाई आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रमोद रामभाऊ रावळे (३३) रा. पवन, शक्तीनगर, तुषार मधुकरराव हांडे (२२) रा. श्रावणनगर, नंदनवन आणि महेंद्र तुळशीराम लाकूडकर (२३) राजेंद्रनगर चौक, नंदनवन, अशी आरोपींची नावे आहेत. प्रमोद हा महेंद्रचा जावई असून तुषार मित्र आहे. प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर मानेवाडा रोड आदिवासी कॉलनी जवळ प्रमोद पान पॅलेससमोर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींना पकडले. त्यांच्याजवळील एका गुलाबी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक किलो पांढरी पावडर होती. कुणालातरी देण्यासाठी ते घेऊन जात होते. नारकोटिक ड्रग डिटेक्शन किटद्वारे त्याची तपासणी केली असता ती पावडर कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. एक किलो कोकेनची बाजारातील किंमत जवळपास ६० लाख रुपये इतकी आहे. कोकेनसह मोटारसायकल आणि ५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, असा एकूण ६० लाख ४५ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम २१ (सी), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातून येतो माल अफगाणिस्तान आणि नायजेरिया येथून तस्करीद्वारे कोकेन भारतात येते. भारतात पाच ते सहा हजार रुपये ग्रामप्रमाणे ते विकले जाते. आजपर्यंत नागपुरात कोकेनची कारवाई झालेली नाही. ज्यांना पकडण्यात आले. ते केवळ डिलिव्हरी बॉय असण्याची शंका आहे. यात आणखी आरोपी आहेत. कोकेन तस्करी करणारी टोळी यामागे असल्याची शक्यता नाकारता येत नाही.