आता नगर परिषद नंतर मनपा व जि.प. निवडणूक विक ास कामांना ब्रेक पदाधिकाऱ्यांची धावाधाव नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या जिल्ह्यात चारपेक्षा जास्त नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुका होत आहेत अशा जिल्ह्यात संपूर्ण निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतु नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषद व महापालिक ांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात सलग पाच महिने निवडणूक आचारसंहिता राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नागपूर शहर व जिल्ह्यातील विकास कामांना ब्रेक लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी ८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होत आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात महापालिक ा व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सलग पाच महिने निवडणूक आचार संहिता कायम राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नागपूर शहरातील शेकडो कोटींची कामे रखडण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकाऱ्यांना विकास कामांचे भूमिपूजन करता येणार नाही. तसेच त्यांना महापालिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित राहता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्याची चर्चा सुरू असतानाच प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभा कक्षात बैठक घेण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. आचारसंहितेसंदर्भात आयोगाकडून कोणत्याही स्वरुपाचे निर्देश प्राप्त झालेले नाही. परंतु तूर्त आचारसंहितेचे पालन करण्याला सर्वांनी सहमती दर्शविली. पदाधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक विचारात घेता डिसेंबर महिन्यात आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तविला जात आहे.त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी आचार संहितेपूर्वी विकास कामांना सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. काही कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काहींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. काही कामांचे भूमिपूजन तर पूर्ण झालेल्या कामांचे प्रकल्पांचे उद्घाटन आचारसंहितेपूर्वी करण्याचे नियोजन केले आहे. परंतु अचानक आचारसंहिता लागू होईल, याची पदाधिकाऱ्यांना कल्पना नव्हती. आचारसंहिता कायम राहिल्यास महापालिके तील सत्तापक्षाच्या अपेक्षांवर पाणी फिरणार असल्याने मंगळवारी दिवसभर पदाधिकाऱ्यांची महापालिकेत धावपळ सुरू होती.
पाच महिने आचारसंहिता ?
By admin | Published: October 19, 2016 3:08 AM