आरोग्यावर परिणाम : थंडीपासून बचाव करणाऱ्या साहित्याच्या मागणीत वाढनागपूर : शहरात रेकॉर्डतोड थंडीचा तडाखा नागरिकांसोबत प्राण्यांनाही बसतो आहे. प्राण्यांच्या आरोग्यावर थंडीचा परिणाम होत आहे. थंडीपासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी बाजारात स्वेटर्स, ब्लँकेट, टी-शर्ट, गादी, टोपी, मोजे उपलब्ध आहे. सध्या या साहित्याची मागणी जोरात वाढली आहे. थंडीमुळे नागपूरकरांना गरम कपड्यांशिवाय बाहेर पडणे कठीण झाले आहे. प्राण्यांची तर अवस्था अतिशय वाईट आहे. थंडीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. मानवाप्रमाणेच सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, श्वसनाचे आजार, लकवा या आजारांचे प्रमाण प्राण्यांमध्ये वाढले आहे. यात सर्वाधिक विदेशी जातीच्या प्राण्यांचा समावेश आहे. नागपुरात विदेशी जातीचे श्वान पाळण्याचे आकर्षण वाढले आहे. जवळपास ५० हजारावर श्वान नागपुरात आहे. वातावरणाचा सर्वाधिक परिणाम त्यांवर होतो. या श्वानांचे थंडीपासून बचाव करण्यासाठी उपलब्ध असलेल्या साहित्याला चांगली मागणी आहे. बळी पडणारे श्वानविदेशी जातीच्या श्वानांचे आकर्षण वाढल्याने नागपुरात ५ हजारापासून ५० हजारापर्यंत श्वान आहेत. वातावरणातील बदलांचा या श्वानांवर सर्वाधिक परिणाम होतो. यात पामेरियन, डॉबरमॅन, पग, डॅशहुन, लॅब्रेडॉर, ग्रेड डेन, बॉक्सर, ची हुआ हुआ, डालमिशिअर या श्वानांचा समावेश आहे.
विदेशी श्वानांना थंडीचा फटका
By admin | Published: December 30, 2014 12:59 AM