शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपच्या निर्णयाला आमचा पाठिंबा; आमच्या मनात किंतू-परंतू नाही,' एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
2
“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
आता 'या' मंदिर परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांना बंदी, कारण...
4
कोरोनापासून मोठ्या जॅकपॉटच्या मागावर होता चीन; आता १००० मेट्रीक टनांचा खजिनाच हाती लागला... 
5
"...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो"; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
6
चंद्रबाबू नायडू सरकारचा मोठा निर्णय! आंध्र प्रदेशातील वक्फ बोर्ड केलं बरखास्त
7
“EVMमध्ये गडबड, ठोस पुरावा मिळणे कठीण, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा”: पृथ्वीराज चव्हाण
8
"आघाडी नाही, स्वबळावर निवडणूक लढवणार", दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत 'आप'ची मोठी घोषणा
9
रतन टाटांनी बिग बींकडे मागितले होते उसने पैसे! कारण ऐकून बॉलिवूडचा 'शहेनशाह' झाला थक्क
10
अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चांवर रविंद्र चव्हाणांनी सोडलं मौन; म्हणाले, "या दोन दिवसांत..."
11
कारमध्ये 'या' गोष्टी ठेवल्या पाहिजेत, प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्या होतील दूर!
12
देवेंद्र फडणवीसांनी केला एकनाथ शिंदेंना फोन, तब्येतीची विचारपूस; मुंबईत कधी परतणार?
13
'योगी बाबां'मुळे Google चे सीईओ सुंदर पिचाई अडचणीत? मुंबई कोर्टाने पाठवली नोटीस
14
“राज्यातील गंभीर परिस्थिती, पेचप्रसंगाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत”: संजय राऊत
15
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेवर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू, तिघे जखमी
16
LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई...
17
आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
18
Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी
19
युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...
20
देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

थंडीत मसाल्याचे भाव ‘गरम’!

By admin | Published: January 05, 2015 12:55 AM

अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे.

आणखी वाढीची शक्यता : अवकाळी पावसाने पिकांना नुकसाननागपूर : अवकाळी पावसामुळे पिकांना झालेले नुकसान आणि विदेशात मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत जिरे, काळी मिरी, खसखस आणि अन्य मसाल्यांमध्ये तेजी आली आहे. थंडीत मसाले गरम झाल्याने स्वयंपाकघरातील पक्वान्नांचा स्वाद काहीसा बिघडला आहे. गेल्या १५ दिवसांत जिरे प्रति किलो ५० रुपयांनी वधारले आहे. भाव वाढल्याने स्टॉकिस्ट आणि सट्टेबाज सक्रिय झाले असून पुढेही भाववाढीची शक्यता आहे. सध्या जिऱ्याचा साठा कमी आहे. सध्या आवक गुजरातेतील ऊंझा येथून आहे. निर्यातवाढीचा परिणामगोस्वामी यांनी सांगितले की, विदेशात जिऱ्याचे उत्पादन फारच कमी असल्याने निर्यात सुरू आहे. अशीच स्थिती राहिल्यास भाव प्रति किलो २०० रुपयांवर जाईल. याप्रकारे अन्य मसाल्याचे भावही वाढतील. विलायची प्रति किलो ४० रुपयांनी वधारली आहे. याशिवाय काळी मिरीच्या भावात निरंतर वाढ होत आहे. सरसूमध्ये ८ रुपयांची वाढ होऊन भाव ४० वरून ४८ रुपयांवर गेले आहेत. खसखसच्या भावात थोडीशी तर नारळाचे भाव वाढले आहेत. बाजारात ओव्याचे नवे पीक आले आहे. मेथीचे भावही वधारले आहे. मेथी दाणे प्रति किलो ७५ रुपयांवरून ९० रुपयांवर पोहोचले आहेत. मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी बाजाराचे समीक्षक चंदन गोस्वामी यांनी सांगितले की, गुजरात राज्यातील राजकोट, जामनगर, राजस्थान येथील जोधपूर, किसनगड येथे जिऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षी जिऱ्याला योग्य भाव न मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी अन्य पिकांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ४० टक्के लागवड कमी झाली. तर दुसरीकडे गुजरातमध्ये पावसामुळे जिऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले. स्टॉकिस्ट आणि सट्टेबाजांनी मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने पुढेही तेजी राहण्याची शक्यता आहे. एक महिन्याआधी प्रति किलो ११० रुपये असलेले जिऱ्याचे भाव १६१ रुपयांवर पोहोचले आहेत. प्लस फूड क्वालिटी जिरे १३५ रुपयांवरून १८० रुपयांवर गेले आहेत. आगामी काही दिवसातही ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)