लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या २४ तासात तापमानात ३.४ डिग्रीने घट झाली असून पारा १२.८ डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. तापमान घटल्याने गारठा वाढला आहे. थंडीला सुरुवात झाली असून, येणाऱ्या दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी यवतमाळात १२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात यवतमाळमध्ये सर्वात थंडी होती.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आर्द्रता ४८ ते ४९ टक्क्यावर पोहचली. त्याचा वातावरणावर परिणाम झाला. पारा घटण्यास सुरुवात झाली. महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानात आणखी घट होईल. यावर्षी थंडीचा जोर जास्त राहणार असल्याचे संकेत आहेत. नागपुरात कमाल तापमान सामान्यापेक्षा १ डिग्री अधिक ३२.७ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले. सकाळी ऊन पडले, गार हवाही होती. वातावरण साफ असल्याने दृश्यता ४ ते १० ते किमी होती.