मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातच नव्हे तर जगभरात अनुयायी विखुरलेले आहेत. हे अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृती वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. अनेकांकडे बाबासाहेबांचे फोटो, त्यांचे शिल्प, त्यांचे ग्रंथ संग्रही आहेत. याच अनुयायात रूपकिशोर कनोजिया यांनीसुद्धा आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांवर डाक विभागाने प्रकाशित केलेल्या पोस्टाच्या तिकिटा दुर्मिळ असे फर्स्ट डे कव्हर संग्रही केले आहे. तर रामसिंग ठाकूर यांच्याकडे भारत सरकारने चलनात आणलेल्या बाबासाहेबांच्या दुर्मिळ नाण्यांचा संग्रह आहे.शहरात रूपकिशोर कनोजिया संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या संग्रहात बाबासाहेबांवर भारत सरकारच्या डाक विभागाने प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर व पोस्टाच्या तिकिटा संग्रही करून ठेवल्या आहेत. यात बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारने १९९१मध्ये प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर, ३० सप्टेंबर २०१५ मध्ये बाबासाहेब आणि संविधानावर काढलेले फर्स्ट डे कव्हर, तिरुवनंतपुरम सरकारने चैत्यभूमी व बाबासाहेबांवर २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेले पोस्टाचे तिकीट, भारतरत्न डॉ. आंबेडकर दूरसंचार प्रशिक्षण संस्था जबलपूर यावर पोस्टाने काढलेले फर्स्ट डे कव्हर, पोस्टाने दीक्षाभूमी व बाबासाहेब यांचे चित्र असलेले पोस्ट तिकीट त्यांच्या संग्रही आहेत. हा ठेवा अतिशय दुर्मिळ आहे. तसेच गौतम बुद्धांचे चित्र असलेली कम्बोडियातील १०० रुपयांची नोट, भगवान गौतम बुद्धांच्या जन्माला २५०० व २५५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पोस्टाने काढलेले फर्स्ट डे कव्हर त्यांच्या संग्रहात आहे.रामसिंगच्या संग्रहातही दुर्मिळ नाणेनाण्यांचा संग्राहक असलेला रामसिंग याने भारत सरकारने चलनात आणलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले नाणे संग्रही करून ठेवले आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २०१५ मध्ये १० आणि १२५ रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध केले होते. हे नाणे रामसिंगने जतन करून ठेवले आहे. तर बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेले १ रुपयाचे नाणेही त्यांच्याकडे बघायला मिळते.हा अनमोल ठेवाबाबासाहेबांचे नाणे असो की डाक तिकीट अतिशय दुर्मिळ आहे. त्यांचा हा स्मृती ठेवा आमच्या संग्रहात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्यासाठी हा अनमोल ठेवा आहे, अशी भावना रूपकिशोर आणि रामसिंग यांनी व्यक्त केली.
संग्रह बाबासाहेबांच्या दुर्मिळ डाक तिकिटे अन् नाण्यांचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:38 AM
अनेकांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातच नव्हे तर जगभरात अनुयायी विखुरलेले आहेत.
ठळक मुद्दे‘फर्स्ट डे कव्हर’पासून कम्बोडियातील १०० रुपयांची नोटही संग्रही : रूपकिशोर कनोजियांनी जोपासलाय छंद