लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने आज मंगळवारी सायंकाळी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी जि. प. नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. डॉ. बलकवडे बुधवार, ३० मे रोजी सकाळी गोंदियाचा पदभार स्वीकारणार आहेत. सीईओंच्या बदलीमुळे त्यांचा प्रभार जि. प. चे अतिरिक्त सीईओ अंकुश केदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. बलकवडे यांनी जि. प. च्या सीईओची ३० एप्रिल २०१६ रोजी सूत्रे स्वीकारली होती. २५ महिन्यामध्ये शासनाने त्यांना पदोन्नती देत जिल्हाधिकारी केले. डॉ. बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.
कादंबरी बलकवडे भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:21 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या गोंधळाला जबाबदार धरून निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने आज मंगळवारी सायंकाळी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी जि. प. नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद नागपूरच्या होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी