लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी महाविद्यालये जास्तीत जास्त प्रमाणात स्वायत्त झाली पाहिजेत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समोरप, नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कारसमारंभ शनिवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी, आ.अनिल सोले, आ.रणधीर सावरकर, महापौर नंदा जिचकार, संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.ज्ञान आणि गुणवत्ता हेच देशाचे महत्त्वपूर्ण भांडवल असून याआधारेच उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होऊ शकते. देशाच्या लोकसंख्येतील मोठी संख्या तरुणांची असून उत्तम मनुष्यबळ निर्मितीसाठी ही आपल्यासाठी संधी आहे. महाविद्यालयांत ‘अप्लाईड’ ज्ञानावर भर दिला गेला पाहिजे. महाविद्यालयांना गुणवत्तेनुसार मानांकन देऊन स्वायत्तता दिल्याने संशोधन क्षेत्रालाही चालना मिळेल, असे फडणवीस म्हणाले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील शिक्षणाचा दर्जा त्यांनी कायम राखला आहे. विदर्भात संस्थेने मोठे काम केले आहे. यापुढेदेखील असेच काम सुरू राहील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी हर्षवर्धन देशमुख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. डॉ.देवेंद्र बुरघाटे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. बारावीतील गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे सचिव व्ही.जी.भांबुरकर यांनी संस्थेचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर फुले यांनी केले तर दीपक कडू यांनी आभार मानले.यावेळी मंचावर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ.बबन तायवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अॅड.गजानन पुंडकर, दिलीप इंगोले, सुहास गोंगे, हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोक ठुसे हे प्रामुख्याने उपस्थित होते.माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोगमुख्यमंत्र्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोग करणाºयांवर टीका केली. एखाद्या गोष्टीत विनाकारण अडथळा निर्माण करणे, किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी या कायद्याचा काही लोक दुरुपयोग करतात. ही प्रवृत्ती योग्य नाही, असे ते म्हणाले.
गुणवत्तेसाठी महाविद्यालयांना स्वायत्तता हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:54 AM
विद्यापीठे ही केवळ पदवी देणारे कारखाने बनता कामा नये. येथील महाविद्यालयांमधून देशाच्या विकासाला हातभार लावणाºया उत्तम मनुष्यबळाची निर्मिती झाली पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आजच्या तारखेत सर्वात आवश्यक बाब आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : शिवाजी विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप