लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : परस्पर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या दाेन कारची आपसात जाेरदार धडक झाली. या अपघात कुणालीही फारशी गंभीर दुखापत झाली नसली तरी, दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले आहे. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी-आमडी (फाटा) मार्गावरील पेंच फाटा परिसरात शनिवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच-३१/सीएस-४९०८ क्रमांकाची कार भरधाव वेगाने आमडी(फाटा)हून पेंचच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच-०५/एक्स-६३८९ क्रमांकाची दुसरी कार पारशिवनीहून आमडी फाटामार्गे रामटेककडे जात हाेती. या दाेन्ही कारची पेंच फाटा परिसरामध्ये आपसात जाेरदार धडक झाली. यात दाेन्ही कारमधील कुणालाही फारशी दुखापत झाली नाही. मात्र, दाेन्ही कारच्या दर्शनी भागाचे माेठे नुकसान झाले.
एमएच-३१/सीएस-४९०८ क्रमांकाच्या कारमध्ये प्रेमीयुगुल असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, अपघात हाेताच दाेघांनीही घटनस्थळाहून पळ काढल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्या कारमध्ये दारूची बाटली व लिपस्टिक आढळून आल्याचे काहींनी सांगितले. याला पाेलीस सूत्रांनी खासगीत दुजाेराही दिला आहे. एमएच-०५/एक्स-६३८९ क्रमांकाच्या कारमध्ये काही समवयस्क मित्र हाेते. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी एमएच-०५/एक्स-६३८९ क्रमांकाच्या कारमधील तरुण स्वप्निल वांदिले, रा. काचूरवाही, ता. रामटेक याच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.