शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

आषाढीनिमित्त रंगला विठुनामाचा गजर

By admin | Published: July 16, 2016 3:07 AM

आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी लाखो भक्तांचा मळा फुलला आहे.

संगीत कला अकादमीचे आयोजन : अजित कडकडेंच्या भक्तिरसाने श्रोते भारावले नागपूर : आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी लाखो भक्तांचा मळा फुलला आहे. पंढरपूरच्या या भक्तिरसाचे सूर दूरवर नागपूरलाही ऐकायला मिळत आहेत. आषाढीच्या पूर्वसंध्येला सायंटिफिक सभागृहात विठुनामाचा गजर रंगला होता. प्रसिद्ध शास्त्रीय गायक अजित कडकडे यांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले. संगीत कला अकादमी व विठोबा दंतमंजन समूहातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुपरिचित गायक विनोद वखरे यांनी संकल्पित केलेले २१ अभंग व भक्तिगीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. ‘जय जय रामकृष्ण हरि...’ या पांडुरंगाच्या नामगजराने विनोद वखरे यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. ‘हरि म्हणा तुम्ही गोविंद म्हणा..., कानडा राजा पंढरीचा..., माझे माहेर पंढरी..., तुझे रुप चित्ती राहो...’ असा रागसंगीताचा स्वरमेळा श्रोत्यांच्या कानात स्थिरावला. ‘भेटी लागी जीवा..., पांडुरंग कांती..., ये ग ये ग विठाबाई..., अजी मी ब्रह्म पाहिले..., रुप पाहता लोचनी..., बोलावा विठ्ठल..., अवचिता परिमळु...’ या भक्तिगीतांनी श्रोत्यांचे तनमन हरवले. अजित कडकडे यांचा खास चाहता वर्ग दूरवर पसरला आहे. त्यांचे शास्त्रीय स्वरातून रसाळ अभंग गायन श्रोत्यांना भक्तिरसात सुखावणारे आहे. त्यामुळे अभंगसम्राट म्हणूनही त्यांची ख्याती आहे. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. ‘विठुराया माझा चंदनाचा कंद..., अबीर गुलाल..., जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले..., वृंदावनी वेणू...’ असे त्यांचे रसाळ सादरीकरण. मुळात त्यांचा गाजदार आवाज, त्यात अर्थभावपूर्ण अभंग व या सादरीकरणाला असलेले शास्त्रीय राग संगीताचे रेशमी अस्तर यामुळे श्रोते त्यांच्या कार्यक्रमाचे खास आतुरतेने वाट पाहतात. विनोद वखरे यांच्यासह श्रुती चौधरी, सीमा दामले या प्रतिभावंत गायकांनीही त्यांना तोलामोलाची साथ दिली. भक्तिरसाच्या या अभंगवारीत गोविंद गडीकर, अरविंद उपाध्ये, श्रीकांत पिसे, मोरेश्वर दहासहस्र, विक्रम जोशी, श्रीधर कारडे यांनी संगीताची साथसंगत केली. यावेळी कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, नगरसेवक गोपाल बोहरे, योगाचार्य शशिकांत जोशी, विठोबा समूहाचे संचालक मनिष शेंडे, कार्तिक शेंडे, सुदर्शन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता खनगई यांनी केले.(वा.प्र)