लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देश जनहित पार्टीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांच्या प्रतिकात्कम्मक पुतळ्याला जाहीर फाशी देऊन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृतीचेही दहन करण्यात आले.देश जनहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद (बालू) मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विषमतेविरुद्ध नारेबाजी करीत आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकरी व पोलीस आयुक्तांनाही सादर करण्यात आले. आंदोलनात दीक्षिता टेंभुर्णे, विक्की येरावार, रिंकू बाराहाते, राजा खान, शार्दुल पाटील, सिद्धार्थ खोब्रागडे, निशांत भगत आदी उपस्थित होते. अजय रंगारी, दिलीप यादव, राकेश बारापात्रे, शशिकांत पारस्कर, अरविंद बांबुर्डे आदींचा समावेश होता.पंतप्रधान, मुख्यमंत्री गप्प का?देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत संविधानाची प्रत राजरोसपणे जाळली जाते आणि त्यावर कुणीही मोठा नेता बोलत नाही, याला काय म्हणावे. या विषयावर पंतप्रधान व मुख्यमंत्री गप्प का आहेत. त्यांचे मौन म्हणजे या घटनेला त्यांचे समर्थन आहे, असे मानायचे का? असा प्रश्न महाराष्ट्र आॅफिसर फोरमचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे यांनी केला आहे.इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमिटीसंविधानाची प्रत जाळण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी इंदोरा वॉर्ड काँग्रेस कमिटीतर्फे दिनेश घरडे, प्रतिकार डोेंगरे, महेश खोब्रागडे, सुनील वासनिक, प्रकाश भिवगडे, नितीन वासनिक, पांडुरंग सहारे, चंद्रकांत जांभुळकर यांनी केली आहे.