शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

दिलासादायक! ६४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:00 AM

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ११७ म्हणजे १९.२४ टक्के होती. पंधरा दिवसांत म्हणजे १५ मे रोजी टक्केवारीत वाढ होऊन ती ५५.१२ टक्क्यांवर आली, तर २० मे रोजी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा ६४.७२ टक्के इतका झाला आहे.देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूची साथ नेमकी संपणार तरी कधी, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाशी झुंजतच जगावे लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोविड-१९’चे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे या आजाराची भीती काहीशी कमी करण्यास मदत करणारी ठरणार आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत नागपुरात झाली आहे. अकोल्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे आता सर्वच जिल्ह्यात रुग्ण दिसून येत असलेतरी त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्याही वाढत आहे. ८ मे रोजी विदर्भात ६०८ रुग्णसंख्या होती. यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यांची टक्केवारी १९.२४ टक्के होती. ९ मे रोजी १३७ रुग्ण बरे झाले, टक्केवारी २१.६७ टक्के होती. १० मे रोजी १८५ रुग्ण बरे झाले, यांची टक्केवारी २८.२४ टक्के होती. ११ मे रोजी २०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. टक्केवारी ३०.१८ टक्के होती. १२ मे रोजी २४७ रुग्ण बरे झाले. टक्केवारी ३५.९५ टक्के होती. १३ मेपासून अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे १३ मे रोजी ३१० रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४२.९९ टक्के होती. १४ मे रोजी १४ मे ३४९ रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४६.७२ टक्के होती. १५ मेपासून नागपुरातही सुधारित डिस्चार्ज धोरण राबविणे सुरू झाले. यामुळे एकट्या मेयो रुग्णालयातून ५१ रुग्ण बरे झाले. तर विदर्भात ४३० म्हणजे ५५.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. १६ मे रोजी ही टक्केवारी वाढून ६०.३२ टक्क्यांवर पोहचली. १७ मे रोजी यात किंचित घट आली. बरे होणाºया रुग्णांची टक्केवारी ५८.८५ टक्के असताना १८ मे रोजी पुन्हा यात वाढ होऊन ती ६३.९२ टक्क्यांवर पोहचली. १९ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१९ वर गेली. टक्केवारीतही वाढ होऊन ६६.३४ पोहचली तर २० मे पर्यंत १,०१२ रुग्णांची नोंद झाली असताना ६५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यांची टक्केवारी ६४.७२ टक्के होती, हे दिलासादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस