शिक्षण सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, नगरसेवक अमर बागडे, रुतिका मसराम व शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर उपस्थित होते.
मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशन संस्थाच्या सहकार्याने झोपडपटटी भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षात सुरु होत आहे. शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्ययावत करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थानी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
या शाळेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल. शाळेच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आलेली आहे. या संस्थेद्वारे शालेय प्रशासन व व्यवस्थापन, शाळांमध्ये नियुक्त करावयाचे शिक्षक, शाळेचा दर्जा आदी बाबींची पूर्तता केली जाईल. मनपातर्फे इमारत, दुरुस्ती, विद्युत व्यवस्था, पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना नि:शुल्क बस पास याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी माहिती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली.
मध्य नागपुरात शुक्रवारपासून प्रवेश
- मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रवेश शुक्रवार पासून सुरू होत आहे.