नागपूर : नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. अव्वाच्या सव्वा बिल पाठविले जाते. कचरा नियमित उचलला जात नाही. साफसफाई नियमित होत नाही. भरमसाठ कर आकारणी करून डिमांड पाठविण्यात आल्या आहेत. अमृत योजनेत जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते बुजविलेले नाही, अशा विविध समस्यांकडे नव्या महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसने महापालिकेच्या कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काँग्रेसचे शहरर्ध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आ. ॲड. अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, मिलींद दुपारे, रमण पैगवार, संजय सरायकर, डाॅ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, विवेक निकोसे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते विविध मागण्यांचे फलक घेऊन महापालिका आयुक्तांच्या कक्षासमोर दाखल झाले. यावेळी आ. विकास ठाकरे म्हणाले, शहरात अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्या टाकण्यात आल्या. यासाठी नाली खोदल्या पण मलबा अजूनही रस्त्याच्या कडेला पडून आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा होत असून अपघात होत आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
घनकचरा उचलण्यासाठी प्रशासनाने एजंसी नियुक्त केली आहे. पण शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे डासांचे व साथरोगांच्या जंतू संसर्गामुळे शहरवासियांच्या आरोग्य खराब होत आहे. ओसीडब्ल्यू मार्फत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परंतु प्रशासनाचे लक्ष नाही. काळया यादीत टाकलेल्या अनेक एजन्सीला मनपालिकेतर्फे कामे दिली जात आहेत. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात स्नेहा निकोसे, डाॅ. सुधीर आघाव, राजेश पौनीकर, गोपाल पटटम, मोतीराम मोहाडीकर, पंकज निघोट, पंकज थोरात, रामभाऊ कळंबे, ईरशाद मलिक, देवेद्र रोटेले, प्रविन गवरे, महेश श्रीवास, अजय गोडबोले, जगदीश गमे, राजेश कुंभलकर, चंद्रकांत हिंगे आदीनी भाग घेतला.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी सुरू असताना कार्यकर्त्यांनी आयुक्त कायार्लयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करीत आशीष दिक्षीत, लंकेश ऊके, राज खत्री, रिजवान रुमवी, नयन तरडकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले