शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

स्थायी समितीच्या बजेटला आयुक्तांची कात्री

By admin | Published: March 19, 2017 2:50 AM

महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा २०४८ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊत यांनी सादर केला होता.

नागपूर : महापालिकेचा २०१६-१७ या वर्षाचा २०४८ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त यांनी सादर केला होता. परंतु वास्तव उत्पन्नाचा विचार करता मार्च अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत १६३६.६३ कोटींचा महसूल जमा होण्याचा अंदाज आहे. जमा व खर्चाचा विचार करता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित अर्थसंकल्पात स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ४१२ कोटींची कात्री लावली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी अध्यक्ष संदीप जाधव यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१६-१७ या वर्षाचा सुधारित तर २०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी आयुक्तांनी १५३४.४५ कोटीचा अर्थसंकल्प सादर के ला होता. मात्र सुधारित अर्थसंकल्पात १०२ कोटींची वाढ अपेक्षित असून २०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प १७०७.८० कोटींचा आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारचे नवीन कर प्रस्तावित नाही. उत्पन्नावाढीसाठी मालमत्ता व पाणीकराचे फेरसर्वेक्षण करून नवीन १ लाख मालमत्तावर कर आकारणी केली जाणार आहे. कर वसुलीवर भर देत १०० टक्के वसुली अपेक्षित आहे. प्रस्तावित उत्पन्नात स्थानिक संस्था करापासून ७५ कोटी, स्थानिक संस्था कर अनुदानातून ६०० कोटी, भांडवली अनुदानातून ३४१.३८ कोटी, मालमत्ता करापासून ३४०.३४ कोटी, पाणीपट्टी १६० कोटी, बाजार वसुली ८.९५ कोटी, नगररचना विभागाकडून ६९.६५ कोटी तर इतर बाबींपासून ११२.५८ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. १७०७.६४ कोटींच्या उत्पन्नातून खर्चाचा विचार करता कर्मचाऱ्यांचे वेतन व आस्थापनावर ३३९.३३ कोटी, सेवानिवृत्त वेतन १३२ कोटी, प्रशासकीय संभाव्य खर्च ४९.८२ कोटी, देखभाल व दुरुस्ती यावर २४२.४७ कोटी, महापालिका योजनाकरिता आर्थिक सहायक अंशदान १२८.५२ कोटी, भांडवली खर्च ३८२.०५ कोटी, भांडवली प्रकल्पात महापालिकेचा सहभाग २७१.७० कोटी तर इतर बाबींवर १६१.७५ कोटींचा खर्च अपपेक्षित आहे. तसेच शेवटची शिल्लक २५.९५ कोटी राहण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात केंद्र व राज्य सरकारकडून ९४१ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. (प्रतिनिधी) उन्हाळ्यामुळे सिमेंट रस्त्यांचे काम संथ उन्हाळ्याच्या दिवसात सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी अधिक पाणी लागते. तसेच या दिवसात शहरातही पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येतील. नवीन सिमेंट रस्त्यांची नवीन कामे तूर्त पुढे ढकलावी लागणार आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांच्या निविदा आठवडाभरात काढण्यात येतील. गेल्या अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला. अर्थसंकल्पात तीन अंदाजपत्रक प्रस्तावित अर्थसंकल्पात नियमानुसार तीन अंदाजपत्रकांचा समावेश आहे. यातील ‘अ’मध्ये महापालिकेचे उत्पन्न व खर्च, त्याचप्रमाणे महापालिका उत्पन्नातून परिवहन विभागाला द्यावयाचा निधी, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यासाठी वळती करावयाच्या निधीचा समावेश आहे. अर्थसंकल्प ‘ब’ हा परिवहन विभागाचे अंदाजपत्रक राहील. परिवहन व्यवस्थापक ते समितीला सादर करतील. त्यानतंर स्थायी समितीकडून सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. अर्थसंकल्प ‘क’ हा पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागासाठी तयार करण्यात येणार आहे.