लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असे महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नियमाने चालणारे आयुक्त मुंढे यांनी नियमांची पायमल्ली केल्याच्या महापौरांच्या आरोपामुळे स्मार्ट सिटीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाच्या १० जुलैला होणाऱ्याा बैठकीची कंपनी सचिवांनी विषय पत्रिका तयार केली. या विषय पत्रिकेतील सहाव्या क्रमांकावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव आहे. नियमबाह्य कामे केल्याप्रकरणी आयुक्तांवर जोशी यांनी तोफ डागली. स्मार्ट सिटीच्या एजेंड्यावरून आयुक्ताचे सीईओपद नियमबाह्य असून त्यांनी १८ कोटींचे देयके एका कंपनीला कुठल्या अधिकारात दिले, असा सवाल उपस्थित केला. कामाची बिले देण्याबाबत यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता, असे आयुक्त म्हणतात. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. त्यांना कसे काय काढले? असेही महापौर म्हणाले. संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यासाठी तसेच विषय पत्रिकेवर स्वत:च्या नियुक्तीच्या विषयाला प्राधान्यक्रम दिला. परंतु एनएसएससीडीसीएलचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी नियमाप्रमाणे विषय पत्रिकेतील विषयाचा क्रम लावल्याचे जोशी म्हणाले.संचालक मंडळाच्या बैठकीत आक्षेप घेणारआयुक्तांच्या सीईओपदी नियुक्ती नियमाने व्हावी, यात गैर नाही. परंतु आयुक्तांनी अधिकार नसतानाही कंपन्यांची बिले काढणे, अधिकाऱ्यांना काढले, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत जाब विचारला जाईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.
महापौर संदीप जोशी म्हणतात, आयुक्त तुकाराम मुंढेंचे सीईओपद नियमबाह्य असल्याचे सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 3:42 PM
तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असे महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देस्मार्ट सिटी एजेंड्यावर आता नियुक्तीचा प्रस्ताव