लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली चार वर्षे राज्य शासन शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक यांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहे. लोक विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनाचा लाभ पोहोचण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजरोहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे, मनरेगाचे आयुक्त एस.आर.नायक, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आमदार यादवराव देवगडे यासह सर्व यंत्रणांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, गेल्या सात दशकात देशात भरीव कामगिरी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जगात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रगल्भ राज्याची संकल्पना साकारताना राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामान्य नागरिक यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षात राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्यात. मात्र त्याचा नियोजनबद्ध पद्धतीने सामना करुन राज्य मार्गक्रमण करीत आहे. जिल्हा नियोजन समितीला ६५१ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यात ६२ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. तसेच शेतकºयांचा ४५० कोटी रुपयांचा पीक विमा काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकांश भागात कमी पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती वाईट होती. मात्र ४० हजार कुटुंबीयांची उपजीविका असणाºया धानासाठी १०० दलघमी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत धान उत्पादक जिल्ह्याला दिलासा दिला आहे. शेतकºयांना १२ तास वीज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.विविध पुरस्कारांचे वितरणपालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते जीवन रक्षा पदक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रभाकर साठे यांचा सत्कार करून त्यांच्यावर आधारित माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू जगदीश आतराम यांचाही गौरव करण्यात आला. सन २०१७-१८ जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील प्रथम पुस्कार ग्रामपंचायत चिरव्हा (तालुका मौदा), द्वितीय ग्रामपंचायत चिचाळा (तालुका भिवापूर) तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत महालगाव (तालुका कामठी) तसेच विशेष पुरस्कार मध्ये स्व. वसंतराव नाईक पुरस्कार पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन ग्रा.प. फेटरी (तालुका नागपूर), स्व. आबासाहेब खेडकर स्मृती कुटुंबकल्याण पुरस्कार ग्रामपंचायत खुबाळा (तालुका सावनेर), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार ग्रा.प. बनपुरी (ता. पारशिवनी) यांना देण्यात आला.युवा माहिती दूत उपक्रमाचा आरंभ शासनाच्या विविध विभागांच्या योजना शहरी व ग्रामीण भागामधील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणाºया ‘युवा माहिती दूत’उपक्रमाचा या वेळी शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान ५० योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या युवकांमार्फत किमान ५० लाख लाभार्थ्यांशी म्हणजेच किमान अडीच कोटी व्यक्तींशी शासन जोडले जाईल. युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसारासाठीही याचा लाभ होईल. नागपूर जिल्ह्यातही या उपक्रमांतर्गत युवा माहिती दूत यांचेमार्फत विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.