नागपूर : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ यांनी सुमोटो याचिकेनुसार कोविडच्या अनुषंगाने निवृत्त न्यायाधीश गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत केलेली आहे. ही समिती मध्यवर्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या निर्देशानंतरही रुग्णास बेड उपलब्ध करून न देणे, रुग्णालयाने आकारलेले बिल न देणे, बिलासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने काम पाहणार आहे. या समितीचे सचिव उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे असतील. ज्या रुग्णांना तक्रारी असतील, त्यांनी collectornagpur2021@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा व्हाॅट्सॲप नं ८८७९६८६२२२ वर आपली तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.
तक्रार दाखल करताना, तक्रारकर्त्याचे नाव, पत्ता, मेल आयडी, फोन नं. त्यांचे रुग्णाशी असलेले नाते, रुग्णाचे नाव, वय, कोणत्या रुग्णालयात दाखल आहे/होता, रुग्णालयात दाखल केल्याचा दिनांक, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचा दिनांक व थोडक्यात तक्रारीचे स्वरूप इत्यादी माहिती देणे बंधनकारक आहे.
------------
महत्त्वाचे संपर्क क्रमांक
कोरोनाबाधितांना त्वरित उपचार मिळावेत, म्हणून नागपूर महानगरपालिकेव्दारे सेंट्रल कंट्रोल रूमची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
बेडसाठी - ०७१२-२५६७०२१, व्हॉट्सॲप -७७७००११५३७ व ७७७००११४७२
ऑक्सिजन व औषधासाठी- ०७१२-२५५१८६६ व्हॉट्सॲप ७७७००११९७४
रुग्णवाहिकेसाठी ०७१२- २५५१४१७, ९०९६१५९४७२
जिल्हाधिकारी कार्यालय
ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०७१२-२५६२६६८