लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी याेजना राबविल्या जातात. त्या याेजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पाेहाेचला पाहिजे. वैयक्तिक लाभाच्या याेजनांचे प्रस्ताव रखडता कामा नये, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य बाळू ठवकर यांनी कुही पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित केलेल्या आढावा बैठकीत केले.
यावेळी त्यांनी राजाेला जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकासकामे तसेच शासकीय याेजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. त्यांनी पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांचा लेटलतिफपणा, वैयक्तिक लाभाच्या याेजनांचे रखडलेले प्रस्ताव, याेजनांच्या लाभापासून वंचित असलेले पात्र लाभार्थी, जलस्वराज्य याेजना, देवळी (कला) येथील दलित वस्तीतील समाज भवानाचे रखडलेले बांधकाम यासह अन्य कामांचा आढावा घेतला.
या बैठकीला पंचायत समिती उपसभापती वामन श्रीरामे, पंचायत समिती सदस्य इस्तारी तळेकर, खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर, विस्तार अधिकारी (पंचायत) सुनील ढेंगे, वामन आत्राम, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष उदय चांदूरकर यांच्यासह तालुक्यातील ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक व पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते.