लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भाजीबाजारात होणारी गर्दी, निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी शारीरिक अंतराची पायमल्ली आणि त्यामुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता कम्युनिटी मार्केटचा रामबाण उपाय मिळाला आहे.ही अभिनव संकल्पना तयार होते आणि रोटरी क्लब ऑफ नागपुर डाऊन टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे महापौर संदीप जोशी यांची ही संकल्पना आहे. या संकल्पनेतून साकार करण्यात येणार आहेत पहिलाच भाजीबाजार पूर्व लक्ष्मी नगर मैदानात गुरुवार 30 एप्रिल पासून नागरिकाच्या सेवेत येणार आहे सकाळी ६ ते ८.३० या वेळेत नागरिक माफक दरात भाजी घेऊ शकतील.लॉकडाऊन दरम्यान शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची व माफक दरातील भाजी व फळे घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागते तेथे गर्दीमुळे शारीरिक अंतर पाळले जात नाही. नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. दारावर आलेल्या भाजी विक्रत्याकडून अधिक दराने भाजी घ्यवी लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून कम्युनिटी मार्केटची संकल्पना मांडण्यात आली आहे. येथे शारीरिक अंतराचा नियान पाळावा लागणार आहे.अशी आहे संकल्पनाही संकल्पना शहरातील ठराविक परिसरातील नागरिकांसाठी मांडण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तुटावी व नागरिकांना ताजा भाजीपाला मिळवा हा यामागे गेतू आहे. तीन,चार वस्त्या,प्रभाग मिळून एक छोटासा बाजार तयार करुन थेट विक्री केली जाणार आहे.