लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : गेल्या ऑगस्ट महिन्यात कन्हान नदीला आलेल्या महापुराचा कामठी कॅन्टाेन्मेंट परिसरात चांगलाच फटका बसला. गाेराबाजार, छाेटी अजनी, उंटखाना, गाैतमनगर छावणी, आजनी रडके, साेनेगाव राजा या भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश जगदाळे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
शासनाने पूरग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी भाजपचे शहर अध्यक्ष संजय कनाेजिया, महामंत्री उज्ज्वल रायबाेले, न. प. विराेधी पक्षनेता लालसिंग यादव, भाजप युवा माेर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कमल यादव, प्रमाेद वर्णम, शेषराव मेश्राम, बनवारी पाली, मोरेश्वर बावणे, देवराव मेश्राम, नितीन मनपिया, राहुल लांजेवार तसेच छोटी आजनी, गोराबाजार, कमसरी बाजार, गौतमनगर छावणी येथील नागरिक उपस्थित होते.