लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचे विडंबन केले जात असल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समितीतर्फे नेटफ्लिक्सच्या विरोधात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या विविध वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू धर्माला हिंसक व भारतीय संस्कृतीला अश्लील दाखवून भारतीय संस्कृती व हिंदूधर्मियांबद्दल जगभरात घृणा, तिरस्कार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्या जात असून, संबंधित वाहिनी, मालक, मुद्रक, विक्रेते, कलावंत, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी १३ सप्टेंबरला सायबर गुन्हे अन्वेषण विभाग आणि मुुृंबई पोलीस आयुक्त तसेच माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयाकडे केल्याची माहिती नागपूर जिल्हा समन्वयक अतुल अर्वेन्ला यांनी दिली.
नागपुरात ‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात सायबर विभागाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:02 AM