लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबद्दल कलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संतप्त झालेल्या महापौर नंदा जिचकार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची पीरिपाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.कवाडे यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देतांना महापौर जिचकार यांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांचा यापूर्वी अक्कू यादव झाल्याचे विसरू नका? अशी धमकी दिल्याचा आरोप पीरिपाने तक्रारीत केला आहे.पीरिपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे आणि शहर अध्यक्ष अरुण गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ही तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटले आहे की, निवडणुकीच्या एका प्रचारसभेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असून त्याबद्दल त्यांनी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त केली आहे. असे असूनही यासंदर्भात लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप कवाडे यांना ठार मारण्याची धमकी ही अत्यंत गंभीर असून जयदीप कवाडे यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तेव्हा या धमकीची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जयदीप कवाडे यांना पोलीस संरक्षण प्रदान करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. यावेळी जयदीप कवाडे, कपील लिंगायत, कैलास बोंबले, सिद्धार्थ सोमकुंवर आदी उपस्थित होते.
नागपूरच्या महापौर नंदा जिचकारांविरुद्ध पीरिपाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:40 AM
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबद्दल कलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संतप्त झालेल्या महापौर नंदा जिचकार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची पीरिपाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
ठळक मुद्देअक्कू यादव करण्याची दिली धमकी