लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे. या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती ‘आयएमए’ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.डॉ. भोंडवे म्हणाले, कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे अनेक चुकीचे सल्ले सोशल मीडियातून येत आहे. नागरिकांसाठी व रुग्णांसाठी ते घातक ठरत आहे. म्हणून कोरोनाशी संबंधित संभ्रमित करणारा, भीती दाखवणारा संदेश सोशल मीडियात आढळून आल्यास अन्य कुणालाही पाठवण्याऐवजी ‘आयएमए’कडे पाठवा. यासाठी ‘९८२३०८७५६१’ व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या संदेशाचे ‘आयएमए’च्या डॉक्टरांकडून त्वरित विश्लेषण केले जाईल आणि त्याची सत्यता सांगणारा संदेश त्या व्यक्तीला त्वरित पाठवला जाईल. अशा प्रकारचा संदेश जर खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण पसरवणारा असेल तर मूळ संदेश पाठविणाºया व्यक्तीविरुद्ध ‘सायबर क्राईम’ अंतर्गत पोलिसात तक्रारही केली जाईल, असा इशाराही डॉ. भोंडवे यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनावरील उपाययोजनांवर महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करीत असल्याचेही सांगितले. पत्रपरिषदेला आयएमएचे नागपूर अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक आढाव, डॉ. नाईक, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. वंदना काटे आदी उपस्थित होते.
कोरोनाची चुकीची माहिती देणाऱ्या डॉक्टर विरोधात एमएमसीकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:02 AM
कोरोना विषाणू संदर्भात चुकीची माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई येथील एका डॉक्टरचा आहे. यात त्या डॉक्टरने मास्क लावण्याची गरज नसल्याचे व संभ्रमित करणारी माहिती दिली आहे.
ठळक मुद्देआयएमए अध्यक्ष भोंडवे : संभ्रमित, भीतीदायक मजकुरावर कारवाई