शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

चतुर्वेदी घरूनच शिवसेनेचा कारभार चालवित असल्याची तक्रार; अनिल देसाईंनी घेतली मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:52 PM

Nagpur News महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत.

ठळक मुद्देजुन्या शिवसैनिकांना मिळेना मानदुष्यंत चतुर्वेदींवर चालवले 'बाण'

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. शेवटी तक्रारींची दखल घेत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी बुधवारी दोन्ही गटाची आमोरासमोर बैठक घेतली. (Complaint of running Shiv Sena from Chaturvedi house; Anil Desai held a meeting in Mumbai) (Dushyant Chaturvedi)

या बैठकीतही नाराज गटाने चतुर्वेदी यांच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली. ते पक्ष कार्यालयाऐवजी घरूनच चालवित असल्याची तक्रार केली. याची दखल घेत देसाई यांनी पक्ष कार्यालयातूनच कारभार करण्याच्या सूचना चतुर्वेदी यांना दिल्या. तसेच नाराज गटालाही पक्षविरोधी भूमिका न घेण्याची ताकीद देण्यात आली.

माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याची गंभीर दखल मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. ही संधी साधत माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, माजी महापौर किशोर कुमेरिया, माजी शहर प्रमुख सुरज गोजे, राजू कनोजिया, जगतराम सिन्हा, बालू मगरे यांनी अनिल देसाई यांच्याकडे चतुर्वेदीच्या कारभाराबाबत तक्रार केली. देसाई यांनी असंतुष्टांना बुधवारी मुंबईत बोलावून घेतले. देसाई यांच्याकडून निरोप मिळताच दुष्यंत चतुर्वेदी हे देखील महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कासपे, मंगला गवरे आदींना घेऊन पोहोचले. खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत देसाई यांनी या सर्वांची बैठक घेतली.बैठकीत किशोर कुमेरिया, कनोजिया, गोजे यांनी शिवसेनेची बैठक पक्ष कार्यालयात न घेता चतुर्वेदी यांच्या घरी होत असल्याची तक्रार केली. आता काँग्रेसच्या घरातून शिवसेना चालवायची का, असा सवाल त्यांनी केला. शहर कार्यकारिणीत तसेच जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवर काँग्रेसमधून आलेल्यांना स्थान देण्यात आले असून, जुने पदाधकारी, माजी नगरसेवक यांना संधीच देण्यात आली नसल्याचेही सांगितले. असे सुरू राहिले तर नागपुरात शिवसेनेला गळती लागेल, असा धोका त्यांनी वर्तविला.

कनोजिया यांनी तर नितीन तिवारी यांच्यावर वसुलीचे आरोप केले. दिवाकर रावते ज्यांना पक्षातून काढणार होते, त्यांना चतुर्वेदी यांनी शहर प्रमुख बनविले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तिवारी यांनी आरोप फेटाळत चतुर्वेदी यांची बाजू भक्कमपणे मांडली. भाजपच्या घोटाळ्यांविरोधात आपण आंदोलने करून आवाज उठविल्याचेही त्यांनी सांगितले. कुमेरिया, हरडे यांनी शहरात दोन महानगर प्रमुख करण्याची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर देसाई यांनी नाराज गटालादेखील पक्षाचे नुकसान होईल, अशी भूमिका घेऊ नका, असे बजावले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKrupal Tumaneकृपाल तुमाने