नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी रविभवन येथे आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरासरी ५०० तक्रारी यावेळी स्वीकारण्यात आल्या. त्यात सर्वाधिक तक्रारी या नागपूर सुधार प्रन्यासच्या संदर्भातील होत्या.सामान्य नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी बावनकुळे दर रविवारी कोराडी येथे जनता दरबार घेतात. यावेळी त्यांनी रविभवनात घेतला. नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो नागरिक त्यांच्या समस्या घेऊन पालकमंत्र्यांना भेटले. यात नागपूर सुधार प्रन्यास, महसूल, भूमापन, महावितरण, महापारेषण आणि इतर विभागाशी संबंधित तक्रारी होत्या. जनतेच्या तक्रारी ऐकून घेत त्या सोडवण्याचे निर्देश बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्मार्ट सिटी योजनेत नागपूरचा समावेश करण्यात आला असून यातून या शहराचा कायापालट केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)रस्त्याच्या मध्यभागीएक लाख विद्युत पोलशहरातील विविध भागातील रस्त्यांवरील एक लाख विद्युत पोल अपघातास कारणीभूत ठरत आहे. पोल हटविण्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी एक विशेष योजना नागपूरमध्ये राबविण्यात येणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.वीज पुरवठा खंडितचौकशी होणारमंगळवारी नागपूर शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. हा प्रकार वाईट आहे. वीज तारा तोडणे हा फौजदारी गुन्हा आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. एस.एन.डी.एल.च्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की सिव्हील लाईन्स विभागाचे महावितरणने टेकओव्हर करणे ही तात्पुरती कार्यवाही आहे. चौकशी अहवाल आल्यावर आणि त्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास पुढील कार्यवाही केली केली जाईल.
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारींचा ओघ
By admin | Published: May 08, 2015 2:16 AM