लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाड, दगड ते जनावरांपर्यंत पूजणारा भारत आपल्याच वृद्धांची काळजी घेत नसल्याचे आजचे धक्कादायक वास्तव आहे. हेल्पएज इंडियाने केलेल्या अध्ययनानुसार संपत्तीच्या वादातून वृद्धांना मारहाण करणे, घराबाहेर काढणे अशा घटना वाढल्या आहेत. ५२ टक्के वृद्ध महिलांनी अत्याचार व शारीरिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत, तर ४८ टक्के वृद्ध पुरुषांनी शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी नोंदविल्या आहेत.हेल्पएज इंडियाने १५ जून २०१९ रोजी विविध ठिकाणातील वृद्धांशी चर्चा व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केलेल्या अध्ययनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या नातेवाईकांकडून ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचेही आढळून आले आहे. मुले, सुना, भावंडे, व्याही, भाचे, पुतणे, नोकर किंवा त्यांची देखभाल करणाऱ्यांना त्यांचे वृद्धत्व ओझे वाटू लागले आहे. ज्येष्ठांच्या ‘आधाराची काठी’ होण्यापेक्षा त्यांच्या जगण्यावरच गदा आणली जात आहे. ७२ टक्के वृद्धांना वाईट वागणूक व शिवीगाळ, तर ४३.१ टक्के वृद्धांना हेटाळणी, कुटुंबीयांपासून वेगळे राहावे लागत असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे.अत्याचाऱ्यांपैकी ३२.५ टक्के जवळचे नातेवाईकअध्ययनात पुढे आले आहे की, वृद्धांवर अत्याचार करणाºयांपैकी ३२.५ टक्के हे जवळचे नातेवाईक असतात. यात २१ टक्के मित्रमंडळी आणि २० टक्के शेजारीपाजारी आहेत. यात मारझोड करणे, टोमणे मारणे, वाईट बोलणे, खिल्ली उडवणे, टीव्ही पाहू न देणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नोंदविण्यात आले.२९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ वाटतात ओझे२०१४ च्या सर्वेक्षणात नागपुरात ८५ टक्के वृद्धांवरील अत्याचाराच्या नोंदी आढळल्या होत्या. २०१५ च्या सर्वेक्षणात तरुणांनीच मध्यमवर्गीयांमधील ज्येष्ठ सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. तर २०१९ च्या या सर्वेक्षणात २९ टक्के नातेवाईकांना ज्येष्ठ ओझे वाटत असल्याचे समोर आले आहे.
शहरासोबतच ग्रामीण भागातही भयावह स्थितीज्येष्ठांवर केवळ शहरी भागातच अन्याय होतो असे नाही, तर ग्रामीण भागतही होत असल्याचे भयावह चित्र आहे. शहरातील काही ज्येष्ठ याविरोधात बोलतात तरी, परंतु ग्रामीणमध्ये दुखणे सहनही होत नाही, आणि बोलताही येत नसल्याच्या विचित्र कोंडीत ते सापडले आहेत. वृद्धांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रासातून सामोरे जावे लागत आहे.-सुनील ठाकूर, वरिष्ठ व्यवस्थापक हेल्पएज इंडिया (विदर्भ)