लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्यामधील १८ पैकी ११ विकास कामे पूर्ण झाली असून, ७ विकास कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. नवघरे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार २२ जानेवारी रोजी विकास कामांचे निरीक्षण केले.यासंदर्भात ताज अहमद राजा व हाजी असलम खान यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. याचिकांवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने नवघरे यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर, पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली.मोठा ताजबाग येथील विकास कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ३० आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध विकास कामांसाठी कंत्राटे देण्यात आली, पण विकास कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन समिती कर्तव्य यशस्वीपणे पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. विकास कामांची तपासणी करण्यासाठी नासुप्रने कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती केली आहे. नासुप्रची ही निष्काळजीपूर्ण कृती आहे. विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंत्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. बी. एम. खान व अॅड. डॉ. ए. एच. जमाल यांनी बाजू मांडली.
नागपूरच्या मोठा ताजबागमधील ११ विकास कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:38 PM
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्यामधील १८ पैकी ११ विकास कामे पूर्ण झाली असून, ७ विकास कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
ठळक मुद्देहायकोर्टात प्रतिज्ञापत्र : अधीक्षक अभियंत्यांनी केले निरीक्षण