लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : शहरात सध्या सर्वच ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरूआहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. दीक्षाभूमी परिसरातही सिमेंट रस्त्याची कामे सुरूहोती. धम्मचक्र प्रवर्तन दिन काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. तरीही या परिसरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत होती. त्यामुळे साहजिकच दीक्षाभूमीवर येणाºया लाखो बौद्ध अनुयायांची प्रचंड गैरसोय होणार होती. एखादा अपघातही घडण्याची शक्यताही होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात पुढाकार घेऊन ८ सप्टेंबर रोजी दीक्षाभूमीवर कसे पोहोचणार आंबेडकरी अनुयायी’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत रस्त्याच्या कामाला गती दिली. परिणामी दीक्षाभूमी परिसरातील सिमेंट रोडचे काम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदरच पूर्ण करण्यात आले आहे. काही काम शिल्लक राहिले असून ते सुद्धा पूर्ण करण्यात येत आहे.दीक्षाभूमी परिसरातील राहाटे कॉलनी ते चोखामेळा वसतिगृह आणि चोखामेळा वसतिगृह ते नीरी रोड व शासकीय चित्रकला महाविद्यालय ते लक्ष्मीनगर चौक तसेच रामदासपेठ ते काचीपुरा चौक आणि काचीपुरा चौक ते बजाजनगर चौक येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू होते. परंतु काही दिवसांपासून या सिमेंट रस्त्यांचे काम थांबले होते. प्रत्येक चौकात अर्धवट काम होते. त्यामुळे या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन ३० सप्टेंबर रोजी येत आहे. दीक्षाभूमी परिसरातील अर्धवट अवस्थेत असलेली सिमेंट रस्त्यांची कामे आणि दीक्षाभूमीवर होणारी गर्दी पाहता आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीपर्यंत कसे पोहोचणार, हा मुख्य प्रश्न होता. सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे निश्चितच अनुयायांना व एकूणच नागरिकांना त्रास होणार होता. एखादी अनुचित घटनासुद्धा घडण्याची भीती होती. त्यामुळे येथील सिमेंट रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण होणे आवश्यक होते. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला. प्रशासनानेही याला गांभीर्याने घेतले आणि सिमेंटच्या अर्धवट राहिलेल्या कामांना गती दिली. त्याचा परिणाम दिसून आला आहे. सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. फूटपाथची काही कामे शिल्लक राहिली आहे. ती सुद्धा ३० तारखेच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
दीक्षाभूमी परिसरातील सिमेंट रस्ते पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:36 AM
शहरात सध्या सर्वच ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरूआहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. दीक्षाभूमी परिसरातही सिमेंट रस्त्याची कामे सुरूहोती. धम्मचक्र प्रवर्तन दिन काही दिवसांवर येऊन ठेवला आहे.
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली दखल : उर्वरित कामेही आटोपण्यावर भर