शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरातील खड्डे पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:19 PM

पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देविविध कामांचा मनपात घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी महापालिका मुख्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजित बांगर, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, झोन सभापती माधुरी ठाकरे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, रिता मुळे, रूपाली ठाकूर, स्वाती आखतकर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, महावितरणचे अधीक्षक अभियंता (शहर) दिलीप दोडके, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले आदी उपस्थित होते.वीज कंपनीने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले असून, सामान रस्त्यांवर पडून आहे. पुन्हा खोदकामासाठी महापालिकेकडे परवानगी मागत आहेत. खड्ड्यांचे पुनर्भरण योग्यरीत्या न केल्यास पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार असल्याचे प्रवीण दटके यांनी निदर्शनास आणले. कामात हयगय केली गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वीज कंपनीने मनपाच्या मुख्य अभियंत्यासोबत समन्वय ठेवून सध्या जी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पूर्वी वीज कंपनीची जी कामे आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.रेशीमबाग येथील मनपाचे समाजभवन संस्थेला देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राजाबाक्षा येथील देवस्थान विकासाकरिता मंजूर निधीचा उपयोग करून तातडीने तेथील कार्य सुरू करण्यात यावे, रमना मारोती ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर निधीतून मंदिर व परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्रांनी दिले. छोटा ताजबागचा स्वदेश दर्शनअंतर्गत विकास प्रस्तावित आहे. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील व विकास कार्य सुरू होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.पट्टे नोंदणी शुल्काचा प्रश्न निकालीशासनाच्या निर्णयानुसार लोकांना पट्टेवाटप करण्यात येत आहे. नझुलच्या जागेवरील पट्टेवाटपासाठी दुय्यम निबंधकाकडे रजिस्ट्रीसाठी गेले असता अडीचशे वर्गफुटासाठी ४४ हजार रुपये मुद्रांकशुल्क मागितल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.उंच राष्ट्रध्वजाबाबत तातडीची बैठकदक्षिण नागपुरातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्यासोबतच कस्तूरचंद पार्क येथील प्रस्तावित सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासंदर्भात मंगळवारी तातडीची बैठक घेऊन त्यावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या