शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; आणखी वर्षभराचा कालावधी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:08 AM

सुमेध वाघमारे नागपूर : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे नागपूर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन लसीकरण, ३१ मेनुसार ३६८७ वर आले आहे. त्यानुसार आठवड्याला जवळपास २५,८०९, महिन्याला १,१०,६१० तर पुढील सहा महिन्यांत म्हणजे डिसेंबर २०२१पर्यंत ६,६३,६६० लोकांचे लसीकरण होईल. यात ३० मेपर्यंत १२,२४,६९० लसीकरण झालेल्या लोकांची संख्या जोडली तरी ती १८,८८,३५० होते. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२,३०,७५३ आहे. त्यानुसार २०२२ संपेपर्यंत लसकीरण सुरू ठेवावे लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या लाटेचा कहर ओसरताच १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. १ एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आल्याने लसीकरणाचा वेग वाढला. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण सुरू झाल्याने रोज साधारण १५ ते २० हजारांदरम्यान लसीकरण होत होते; परंतु त्यातुलनेत लसीचा साठा कमी पडला. खासगी हॉस्पिटलमधील केंद्रे बंद करण्यात आली. सोबतच १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही थांबविण्यात आले. यातच कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा कालावधी १२ ते १६ आठवड्यांपर्यंत लांबविण्यात आल्याने केंद्रावरील गर्दीच नाहीशी झाली. ३१ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील जवळपास २५० वर केंद्रांवर केवळ ३,६८७ लसीकरण झाले. याच संख्येने लस दिल्यास या वर्षअखेरपर्यंत केवळ १८,८८,३५० लोकांचे लसीकरण होईल आणि २३ लाखांवर लोक शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

::२९ मेपर्यंत झालेले लसीकरण

वयोगट : पहिला डोस : दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी :६४२५७: ३३९३७

फ्रंटलाइन : ११३१२० :३४५६७ :

ज्येष्ठ नागरिक : ३३७८९३:११९९०६

४५ते ६० वयोगट :४२४७८७ : ७८०७८

१८ ते ४४: १८१४५ :००००

:: १८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?

१८ वर्षांपेक्षा कमी वयोगट असलेल्या मुलांसाठी अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. मात्र, या वयोगटात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात ती सुरू होण्याचे संकेत आहेत. १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले आहे. आवश्यक लसींचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरू होईल, असे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, नागपुरात खासगी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात १८ वर्षांवरील वयोगटाचा समावेश असल्याने गर्दी उसळली आहे.

-डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचा प्रयत्न

महानगरपालिकेची १००वर लसीकरण केंद्रे आहेत. यापेक्षा जास्त खासगी हॉस्पिटल व खासगी संस्थांमध्ये लसीकरण केंद्रे आहेत. सध्या ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू असल्याने गती मंदावल्याचे दिसून येते; परंतु जेव्हा राज्याकडून १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा गती वाढेल. या डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त मनपा